गुहागर, ता. 06 : तालुक्यातील गिमवी गावचे जेष्ठ नागरिक श्री. आत्माराम विठ्ठल जाधव यांचे वयाच्या 96 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. तालुक्यात व जिल्ह्य़ात भजन सम्राट म्हणून ते प्रसिद्ध होते. त्याच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. Death of Atmaram Jadhav in Gimvi
श्री. आत्माराम विठ्ठल जाधव यांनी गिमवी देवघर गावचे सरपंच म्हणून सलग 15 वर्षे पद भूषविले होते. माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम पाहीले. तसेच गुहागर तालुका मराठा भवन फाऊंडेशन्सचे ते मेंबर्स होते. Death of Atmaram Jadhav in Gimvi
भजन सम्राट म्हणून तालुक्यात व जिल्ह्य़ात प्रसिद्ध व्यक्तीमत्व असलेल्या जाधवांना भजनाची व शेतीची खूप आवड होती. आयुष्य भर शेतीकडे लक्ष देऊन गावातील मोठे शेतकरी म्हणून त्याचा आदर होता. Death of Atmaram Jadhav in Gimvi
आत्माराम जाधव यांची आठवण सांगताना निवृत्त पोलिस निरिक्षक (राज्य उत्पादन शुल्क)
सुभाष महादेव जाधव यांना गहिवरून आले. माझ्या जीवनाला आत्माराम जाधव यांच्यामूळे कलाटणी मिळाली. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर सुभाषला आणखी शिकू दे त्याला देवघर हायस्कूल मध्ये जाऊ दे असा आग्रह आत्माराम काकानी वडीलांजवळ केला. म्हणून मी पुढील शिक्षण घेऊ शकलो. आठवडाभरापूर्वी खूप गप्पा मारल्या जुन्या आठवणीत ते रमून गेले होते. त्यांच्या निधनाचीही बातमी ऐकून धक्का बसला. Death of Atmaram Jadhav in Gimvi