दिल्ली, ता. 26 : 2000 रुपयांची नोट जमा करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे. जर तुम्ही अजून 2000 रुपयांची नोट बँकेत जमा केली नसेल तर तुमच्याकडे आता खूपच कमी वेळ राहिला आहे. आरबीआयनुसार, 1 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार 2000 रुपयांच्या एकूण 93 टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. Deadline for depositing notes
RBI ने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. रिझर्व्ह बँकेने लोकांना विनंती केली आहे की त्यांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्यात किंवा त्या इतर नोटांसह बदलून घ्याव्यात. 2000 रुपयांची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर चलनात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. पण मे महिन्यात आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. ज्या उद्देशाने ती आणली होती ती पूर्ण झाल्याचे बँकेने म्हटले आहे. Deadline for depositing notes
लोक बँकेत जाऊन त्यांच्या खात्यात 2000 रुपयांची नोट जमा करू शकतात. तसेच, नोट कोणत्याही बँकेत बदलता येते. आरबीआयसह देशातील सर्व बँकांमध्ये नोट बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. 2000 रुपयांची नोट बँक खात्यात जमा करण्यासाठी KYC फॉर्म आवश्यक असू शकतो. 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून न घेतल्यास काय होईल, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुमची 2000 रुपयांची नोट 30 सप्टेंबरनंतर लीगल टेंडर राहील. पण ती बँकांमध्ये जमा करता येत नाही आणि व्यवहारातही चालणार नाही. ती फक्त आरबीआयमध्ये बदलले जाऊ शकते. मात्र यासाठी तुम्ही नोटा वेळेत का सादर केल्या नाहीत किंवा बदल का केल्या नाही, याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. Deadline for depositing notes