माजी विद्यार्थी अजय डावल यांची सामाजिक बांधिलकी
गुहागर, ता.18 : तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे माजी विद्यार्थी अजय शांताराम डावल यांनी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. Daval’s social commitment

आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी आपण काहीतरी देणे लागतो. ही भावना कायम ठेवत माजी विद्यार्थी अजय डावल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे 700 वह्यांचे मोफत वाटप केले. यावेळी प्राचार्य बी.ए. थरकार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप चव्हाण, उपसरपंच अनंत डावल, माजी सरपंच प्रकाश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, प्रा. अमोल जडयाळ, आशिष कारेकर, शांताराम डावल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री देवरुखकर यांनी तर आभार शिक्षक श्रीनाथ कुळे यांनी मानले. Daval’s social commitment
