गुहागर, ता. 27 : रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेती कापणीला आली आहे. दसऱ्यापासून भात कापणी सुरू होते, मात्र सध्या पडत असलेल्या पावसामुळे भात शेतीचे अमाप नुकसान सुरू आहे. पावसाने भात पीक जमिनीवर पडत असल्याने लोंबीचे भात पुन्हा रुजून येत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. समुद्र किनारपट्टीला व खाडी भागात असलेल्या भात शेतीचे अनाथ नुकसान झाले आहे. Damage to the rice farm at harvest

कोकणात गेल्या चार महिन्यांपासून पडणाऱ्या पावसाने सुरवातीच्या काळात भात शेतीला मोठा दिलासा दिला. मात्र गेल्या महिन्याभरापासून पडणाऱ्या पावसाने भात शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले आहेत. महसूल खात्याने कोकणातील भात शेतीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हलव्या भाग शेतीचे नुकसान झाले आहे. भात शेती जमिनीवर आडवी झाल्याने काही ठिकाणी दाणे रुजून आले आहेत. दसऱ्यानंतर पाऊस असाच सुरू राहिला तर शेतकऱ्यांसमोर कापलेले भात पीक सुकवण्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. Damage to the rice farm at harvest
कोकणातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी ही भात शेतीवर अवलंबून असल्याने सामान्य शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसणार आहे. कोकणात असंख्य छोटे शेतकरी असून ठराविक दळीमध्ये शेती करतात त्यांचे उत्पन्नही मर्यादित असते. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. Damage to the rice farm at harvest
