२५० सायकलस्वारांची उपस्थिती; लकी ड्रॉ बक्षिसांचे वाटप
गुहागर, ता. 24 : दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार २२ मे २०२२ रोजी आयोजित केलेली दापोली समर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये सर्व वयोगटातील २५० हुन अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दापोलीकर सायकल मार्गावर जमले होते. ही सायकल स्पर्धा आझाद मैदान दापोली येथून सकाळी ६:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झाली. Cyclothon competition in Dapoli
स्पर्धकांनी अनेक फेऱ्या मारत ५ ते २५ किमी अंतर सायकल चालवली. या स्पर्धकांना दापोली सायकलिंग क्लबतर्फे मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. दापोली अर्बन बँक पुरस्कृत, श्री सायकल मार्ट सौजन्याने लकी ड्रॉ बक्षिसामध्ये २ सायकल आयुष शिर्के आणि अवनी आशिष घाणेकर यांनी जिंकल्या. तसेच १० सायकल हेल्मेट आणि इतर अनेक बक्षिसे लकी ड्रॉ मधून वाटण्यात आली. Cyclothon competition in Dapoli
यावेळेला प्रमुख अतिथी दापोली प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ ममता मोरे, महिला व बाल कल्याण सभापती सौ साधना बाळासाहेब बोत्रे, दापोली अर्बन बँकचे उपाध्यक्ष श्री संदीप दिवेकर, जेष्ठ संचालक सुभाष शेठ मालू, संचालिका सौ संगीता तलाठी, सौ रमा बेलोसे, दापोली पोलीस टीम इत्यादी अनेक मान्यवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. नगराध्यक्षा ममता मोरे, सभापती साधना बोत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या स्पर्धेत सहभाग घेत सायकल चालवली. Cyclothon competition in Dapoli
या स्पर्धेत खेड, गुहागर, महाड, पुणे, मुंबईहूनही काही स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा मार्ग आझाद मैदान, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक, पांगारवाडी जालगाव, लालबाग, आझाद मैदान असा ५ किमीचा होता. Cyclothon competition in Dapoli
ह्या स्पर्धेसाठी उत्कर्ष कोकण सेवा संघ, उपजिल्हा रुग्णालय दापोली टीम, जोशी ब्रदर्स मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, त्रिस्केलिऑन लक्सरी फॅमिली होम स्टे दापोली, सिल्व्हर सॅण्ड बीच रिसॉर्ट मुरुड, श्रीकांत सायकल शॉप, राहुल राठोड, डॉ विद्या दिवाण, निलिमा देशमुख, रेखा जेगलकर, राजेंद्र नाचरे, उमेश रेवाळे, महेश भांबुरे, राजू तलाठी, युवराज पेठे, डॉ समीर परांजपे, विनोद म्हस्के, पिलू शेठ, लाईफस्टाईल फिटनेस जिम, राहुल मंडलिक इत्यादी अनेकांनी सहकार्य केले. Cyclothon competition in Dapoli
या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात सुनिल रिसबूड, संदीप भाटकर, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, पराग केळसकर, सुरज शेठ, प्रशांत पालवणकर, शैलेश मोरे, मृणाल मिलिंद खानविलकर, उत्पल वराडकर, रोहन कदम, राकेश झगडे, आकाश तांबे, झाहीद दादरकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Cyclothon competition in Dapoli