• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दापोलीत समर सायक्लोथॉन स्पर्धा

by Guhagar News
May 21, 2022
in Sports
18 0
0
Cyclothon competition in Dapoli
35
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लकी ड्रॉ मध्ये जिंका २ सायकल, २०० सायकलस्वारांना गुडी बॅग

गुहागर, ता. 21 : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार दि. २२ मे २०२२ रोजी दापोली समर सायक्लोथॉन २०२२ चे आयोजन केले आहे. ही सायकल स्पर्धा आझाद मैदान दापोली येथून सकाळी ६:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु होईल.  Cyclothon competition in Dapoli

ही स्पर्धा फॅन राईड आणि चॅलेंज राईड अशी २ गटात आहे. फन राईड विनामूल्य आहे. चॅलेंज राईड ५, १०, १५, २०, २५ किमीची असून यासाठी प्रवेश शुल्क २०० रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये आहे. सुरवातीला नोंदणी केलेल्या पहिल्या २०० सायकलस्वारांना गुडी बॅग मिळणार आहेत. Cyclothon competition in Dapoli

सायकल राईड मार्ग आझाद मैदान – डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक – एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक – पांगारवाडी जालगाव – लालबाग – उदयनगर – आझाद मैदान असा ५ किमीचा असून यावर फेऱ्या मारुन ५ ते २५ किमी अंतर पूर्ण करता येणार आहे. हे अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धकांमधून लकी ड्रॉ ने बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासाठी २ सायकल, हेल्मेट अशी ५० हजारांची बक्षिसे वाटण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वात कमी वयाचा व जास्त वयाचा सायकलस्वार, सजवलेली सायकल अशी काही खास बक्षिसे देण्यात येणार आहेत. सायकल राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, सरबत, एनर्जी स्नॅक्स, ऍम्ब्युलन्स मेडिकल अशी मदत करण्यात येणार आहे. Cyclothon competition in Dapoli

ऑनलाईन नोंदणी https://www.townscript.com/e/dapoli-summer-cyclothon-2022-314124 या लिंक वर करु शकता, तर ऑफलाईन नोंदणी फॉर्म खालील ठिकाणी भरता येतील.

१. समर्थ कुशन एजन्सी, अर्बन कॉलेजजवळ
२. सुनिल ऑटोमोबाईल, बुरोंडी नाका
३. विनी इलेक्ट्रिकल, फॅमिली माळ
४. श्री सायकल शॉप, केळसकर नाका
५. सम्यक किराणा शॉप लष्करवाडी
६. मंदार कार ॲक्सेसरीज, सुतारवाडी गिम्हवणे
७. जोशी ब्रदर्स मेडिकल, बाजारपेठ

सुरवातीला नोंदणी केलेल्या पहिल्या २०० सायकलस्वारांना गुडी बॅग मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी अंबरीश गुरव ८६५५८७४४८६, पराग केळसकर ९४२२४३३२९१ यांना संपर्क करु शकता. Cyclothon competition in Dapoli

या स्पर्धेत खेड, गुहागर, पुणे, मुंबईहून काही स्पर्धक सहभागी होणार आहेत. तसेच दापोलीतील अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, पोलीस इत्यादी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, सायकल चालवत सहभागी होणार आहेत. त्यामुळे दापोलीत रविवार सकाळ सायकलमय होणार आहे.

Tags: Cyclothon competition in DapoliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.