• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाचनसंस्कृतीच्या जनजागृतीसाठी सायकल फेरी

by Guhagar News
February 15, 2022
in Guhagar
16 0
0
वाचनसंस्कृतीच्या जनजागृतीसाठी सायकल फेरी

Cycleferi for Reading Culture

31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दापोली सायकलिंग क्लबचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त उपक्रम

गुहागर, ता.15 : पुस्तकांची सोबत हा सर्वोत्तम आनंद असतो. म्हणून १४ फेब्रुवारी हा जागतिक पुस्तक आदानप्रदान दिवस म्हणूनही साजरा केला जातो. आपण वाचलेल्या पुस्तकांचा आनंद दुसऱ्यांनाही झाला पाहीजे. वाचन संस्कृती जतन होण्यासाठी पुस्तकांची देवाण-घेवाण करावी. त्यामुळे विचारांची देवाण घेवाण होत असते. यानिमित्ताने पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचीत जावे या जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवारी, १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. Cycleferi for Reading Culture

आझाद मैदान दापोली येथून सुरु झालेली सायकल फेरी नॅशनल हायस्कूल, काळकाई कोंड आमराई, कलाम गल्ली, नागरबुडी, भारतनगर, नशेमन कॉलनी, जोगेळे शाळा, काळकाई देवी मंदिर, आझाद मैदान अशा ६ किमीच्या मार्गावर झाली. Cycleferi for Reading Culture

Cycleferi for Reading Culture

या सायकल फेरीत मुलांसोबत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी सायकल फेरीचे खाऊ, चिक्की, पाणी, सरबत देऊन स्वागत करण्यात आले. काळकाई कोंड येथे नगरसेविका प्रिती सतीश शिर्के, बाबूशेठ शिर्के आणि ग्रामस्थ यांनी खाऊ वाटून स्वागत केले. शेख उस्मान कॉलनी, नशेमन कॉलनी येथेही दाउद इब्राहिम परकार, शाहबुद्दिन चिपळूणकर, शाहबाझ देशमुख, अब्दुलाझिझ दादरकर, सूरवत शरीफ परकार, हुसैन कुरये, निसार चिकटे, सईद देशमुख व ग्रामस्थ यांच्यातर्फे पाहुणचार झाला.  ग्रामस्थांनी सायकल फेरीला शुभेच्छा दिल्या आणि प्रत्यक्ष सहभाग घेऊन सायकल पण चालवली. Cycleferi for Reading Culture

Cycleferi for Reading Culture
Cycleferi for Reading Culture

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी. या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्य सायकल विषयक उपक्रम, सायकल राईड, स्पर्धा, शर्यती, सायकल फेरी इत्यादींचे आयोजन केले जाते.  Cycleferi for Reading Culture

Cycleferi for Reading Culture
Cycleferi for Reading Culture

या सायकल फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, उत्तम पाटील, सुनिल रिसबूड, केतन पालवणकर, मृणाल खानविलकर, झाहीद दादरकर, प्रशांत पालवणकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. Cycleferi for Reading Culture

Tags: Cycleferi for Reading CultureGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.