जागतिक महिला दिनानिमित्त; दापोलीतील सायकलिंग क्पलबचा उपक्रम
गुहागर, ता. 4 : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, ६ मार्च २०२१ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दापोलीच्या जडण घडणीमध्ये महत्वाचे योगदान दिलेल्या काही आदरणीय महिला या सायकल फेरीमध्ये सहभागी होणार आहेत. Cycle Rally in Dapoli


आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात. हे आता लोकमान्य झाले आहे. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. दापोलीकर महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत, हे सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. Cycle Rally in Dapoli
ही सायकल फेरी आझाद मैदान- केळसकर नाका- बुरोंडी नाका- पटवर्धन हॉस्पिटल- गिम्हवणे गणेश मंदिर- गोडबोले आळी- मेहेंदळे आळी- दत्त मंदिर- उगवत वाडी- गिम्हवणे ग्रामपंचायत- आझाद मैदान अशा ७ किमीच्या मार्गावर आयोजित केली गेली आहे. त्यासाठी सकाळी ७.३० वाजता आझाद मैदान ध्वजस्तंभ येथे जमायचे आहे. तेथे सायकल फेरी मार्गाबद्दल काही सूचना देण्यात येतील आणि सायकल फेरीला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरवात होईल. Cycle Rally in Dapoli
या सायकल फेरीमध्ये सायकल सावकाश, कमी वेगाने चालवल्या जातील. या सायकल फेरीसाठी कोणतेही शुल्क असणार नाही. सोबत मास्क बाळगणे जरुरीचे आहे. आपण आपली कोणतीही सायकल घेऊन येऊ शकता. Cycle Rally in Dapoli
अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ९१५८५२८५७३ हे आहेत.

