संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 09 : आमदार भास्करराव जाधव यांनी सीआरपींच्या मानधनात वाढ व बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून शासन दरबारी आवाज उठवला याबाबत तालुक्यातील सीआरपी’नी सत्कार केला. CRP felicitated MLA Jadhav

उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर महिला सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या सीआरपी यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेत करून तसा निर्णय शासनाकडून करून बचतगटातील महिंलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, सरकारी इमारतींमध्ये त्यांच्यासाठी हक्काची जागा राखीव ठेवण्यात यावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू ठेवल्याबद्दल गुहागर तालुक्यातील ग्रामिण भागातील सर्व सीआरपी’नी आम.भास्करराव जाधव यांच्या चिपळूण कार्यालयात शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे आभार मानले. यानिमित्ताने आमदार श्री. जाधव यांनी देखील या सर्वांना भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. CRP felicitated MLA Jadhav

