गुहागर, ता. 29 : रत्नागिरी : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांनी आजपर्यंत दहा हजार मराठी शब्दकोड्यांचा टप्पा ओलांडला आहे. आता ६२ हजार पाचशे चौकोनात उभे- आडवे १८ हजार शब्दांचे कोडे साकारले आहे. याचे काम सध्या अजून सुरू आहे. लवकरच हे शब्दकोडे आशिया बुक रेकॉर्डमध्ये जाईल, असा विश्वास प्रसन्न कांबळी यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. Crossword puzzle of 18 Thousand Word


श्री. कांबळी हे गेली २७ वर्षे शब्दकोडी साकारत आहेत. बारा वर्षांपूर्वी त्यांना ३३६४ शब्दांचे व दहा हजार चौकोनांचे शब्दकोडे साकारून लिम्का बुकमध्ये विक्रमाची नोंद केली. विशिष्ट विषयावर कोडे, पाच मिनिटांत कोडे, एकाला एक जोडून महाशब्दकोडे होईल, अशी अनेक कोडी त्यांनी रचली आहेत. ते म्हणाले, एकूण दहा हजार शब्दकोडी पूर्ण झाली आहेत. सध्या अठरा हजार शब्दांचे अतिभव्य शब्दकोडे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते म्हणाले, सुरवातीला वृत्तपत्रांतील कोडी सोडवत होतो. मलाही अशी कोडी करता येतील या विचाराने मराठी शब्दकोश आणले व सुरवात केली. १९९५ ला पहिले कोडे प्रकाशित झाले. पुण्यातील एका शब्दकोडेकारांनी ६० बाय ६० चे कोडे केले व त्याची नोंद लिम्कामध्ये झाल्याचे पाहिल्यानंतर मी ४४ दिवसांत १०० बाय १०० चे कोडे साकारले व लिम्कामध्ये नोंद झाली. Crossword puzzle of 18 Thousand Word


दिवंगत आई- वडीलांचे आशीर्वाद आणि पत्नी सौ. मयुरी हिच्या सहकार्याने हे यश मिळवले आहे. लिम्का बुकमध्ये विक्रम होणार असल्याने रात्रीच्या वेळेस दररोज तीन-चार तास काम करत होते. त्या वेळी रात्री उशिरापर्यंत जागून पत्नी सौ. मयुरी माझ्यासोबत जेवणाकरिता रात्री उशिरापर्यंत ती थांबायची, थकवा, डोळे दुखायचे म्हणून डोळ्यात कैलास जीवनसुद्धा घालायची, असे सांगताना प्रसन्न कांबळी गहिवरले. श्री. कांबळे हे सध्या ठाण्यात वास्तव्याला आहेत. शब्दकोडी बनवणे, उकडीचे मोदक आणि सत्यनारायण प्रसाद बनविणे, रांगोळी आणि मोफत विवाह मेळावे आयोजित करणे अशा उपक्रमांमुळे ते सुपरिचित आहेत. Crossword puzzle of 18 Thousand Word
रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या अनेक दैनिके आणि साप्ताहिकांना शब्दकोडी पुरविणारे प्रसन्न रंगनाथ कांबळी
प्रसन्न रंगनाथ कांबळी यांच्या घराण्याचे मूळ गाव वेंगुर्ले तालुक्यातील आरवली. दापोली तालुक्यातील केळशी येथे त्यांचा जन्म झाला. ‘महाराष्ट्र कृषी उद्योग मर्यादित’ या शासनाच्या अंगीकृत उद्योगात वरिष्ठ अधिकारी म्हणून ते अनेक वर्षे रत्नागिरीत कार्यरत होते, निवृत्त झाल्यावर त्यांचे ठाणे येथे वास्तव्य असते. रत्नागिरीतील वास्तव्यात शब्दकोडी तयार करणे, उकडीचे मोदक बनविणे, रांगोळी काढणे आणि मोफत विवाह मेळावे आयोजित करणे इत्यादी उपक्रमांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. Crossword puzzle of 18 Thousand Word
प्रसन्न कांबळी यांनी सन १९९५ पासून मराठी शब्दकोडी करून वृत्तपत्रांत देण्यास सुरूवात केली. ‘दै.रत्नागिरी एक्स्प्रेस’च्या प्रकाशक सौ.नमिता कीर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. याच वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक बाळ भिसे यांच्या सहकार्याने या उपक्रमाला नियमितपणा आला. त्यानंतर ‘दै.रत्नागिरी टाइम्स’, ‘दै.भैरव टाईम्स’, ‘दै.तरूण भारत’, ‘दै.कोकण गर्जना’, ‘दै.रत्नागिरी समाचार’, ‘दै.प्रहार’, ‘दै.पुष्पराज’, ‘साप्ताहिक बलवंत’, ‘पाक्षिक रंगयात्री’, सांगली येथून प्रसिद्ध होणारे ‘नियती वेध’,(संपादक:हामजा मुल्ला), ‘दै.रत्नागिरी टाइम्स’ची पुरवणी, ‘दै.तरूण भारत’ची पुरवणी, श्री.पालकर यांचे गणपती विशेषांक, श्री.मालगुंडकर यांचा दिवाळी विशेषांक, इत्यादी दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, पुरवण्याना शब्दकोडी पुरवून ती प्रसिद्ध झाली आहेत, अनेक वेळा, एकाच वेळी दोन दोन दैनिकांना शब्द कोडी देऊन ती प्रसिद्ध देखील झाली आहेत. Crossword puzzle of 18 Thousand Word
उकडीचे मोदक करण्यात तरबेज असलेले श्री. कांबळी यांनी श्री गणेशाचे बेचाळीस लाख जप केले आहेत. गेल्या सव्वीस वर्षांची अविरत तपस्या, हे माझ्या यशाचे गमक आहे, असे म्हणून ‘चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती श्रीगणेश, श्रीदेव वेतोबा, कुलस्वामिनी म्हाळसाई माता, आपले दिवंगत आई वडील यांच्या आशीर्वादाने आणि आपली अर्धांगिनी सौ.मयूरी यांच्या सहकार्याने हे यश मी खेचून आणले, असे त्यांनी सांगितले. Crossword puzzle of 18 Thousand Word
नागरी सत्कार : उदय सामंत (Uday Samant)
पत्रकार परिषद सुरू असताना उद्योजक प्रसन्न आंबुलकर यांनी मंत्री उदय सामंत यांनी मोबाईलवर संपर्क साधला, त्यावेळी मंत्री सामंत यांनी प्रसन्न कांबळी यांचे तोंड भरून कौतुक केले. माझ्या मतदारसंघातील एक व्यक्ती हा विक्रम करत असल्याबद्दल अभिमान वाटत असून त्यांचा सर्व नेत्यांसोबत जाहीर नागरी सत्कार करू, असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले. Crossword puzzle of 18 Thousand Word

