जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे दि. १२ डिसेंबर रोजी आयोजन
रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने मंगळवार दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी क्रॉस कंट्री जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून निवडण्यात येणारा संघ बुलढाणा येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, लांजा येथे सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तरी सर्व खेळाडूंनी ८ वाजता उपस्थित रहायचे आहे. Cross Country Selection Trial Competition

या स्पर्धेत पुरुष व महिला (१० किमी), २० वर्षाखालील मुले व मुली (६ किमी.), १८ वर्षाखालील मुले व मुली (४ किमी.), १६ वर्षाखालील मुले व मुली (२ किमी.) या गटात आयोजित करण्यात आली आहे. राज्य स्पर्धेसाठी पुरुष व महिला संघ प्रत्येकी सहा जणांचा तर १८ आणि १६ वर्षे वयोगटासाठी प्रत्येकी दोन जणांचा संघ सहभागी होणार आहे. २० वर्षाखालील गटात १५ जानेवारी २००४ ते १४ जानेवारी २००६, १८ वर्षाखालील गटात १५ जानेवारी २००६ ते १४ जानेवारी २००८, तर १६ वर्षाखालील गटात १५ जानेवारी २००८ ते १४ जानेवारी २०१० या कालावधीत जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येईल. Cross Country Selection Trial Competition
राज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंचा युआयडी नंबर असणे आवश्यक आहे. खेळाडूंना आपली प्रवेशिका या http://ratnagiriathletics.in/ वेब साईट वर १० डिसेंबर २०२३ पर्यंत नोंदविता येईल. प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना प्रावीण्य प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे. Cross Country Selection Trial Competition
