दापोली इलेव्हन संघ विजेता ; चिंचेश्वर साखरी आगर संघ उपविजेता
गुहागर, ता. 28 : दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत येथे पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नूकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामवंत संघ आणि खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे विजेतेपद दापोली इलेव्हन संघाने तर उपविजेतेपद चिंचेश्वर साखरी आगर यांनी पटकाविले. Cricket Tournament at Palshet

यावर्षी प्रथमच पावसाळ्यात ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामवंत संघ आणि खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धा रोमहर्षक आणि चुरशीची झाली. अंतिम सामना दापोली इलेव्हन आणि चिंचेश्वर साखरी आगर या दोन बलाढय संघामध्ये झाला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर दापोली संघाने चिंचेश्वर संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. बरसणाऱ्या पावसात प्रथम फलंदाजी करताना चिंचेश्वर संघाने 42 धावा केल्या. या धावांचा दापोली इलेव्हन संघाने उत्कृष्ट फलंदाज निखिल पारवे याच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर सहज पाठलाग केला. आणि उपविजेते पदावर चिंचेश्वर संघाला समाधान मानावे लागले. Cricket Tournament at Palshet
उत्तेजनार्थ बक्षीस बाळू इलेव्हन सुरळ आणि गार्गी वरवडे या दोन संघांना देण्यात आले. टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीने कृष्णा सातपुते, कृष्णा पवार, नाझीम गुल्ली, अयुब शेख, अख्तर शेख, योगेश पेणकर, दर्शन बांदेकर, दाजी नाईक, निखिल पारवे, सुरज करकरे, प्रशांत घरत, गोपाळ भट्टा या खेळाडूंनी विविध संघातून स्पर्धेत सहभाग घेतला. Cricket Tournament at Palshet

प्रथम पारितोषिक 51000/- ₹ आणि चषक द्वितीय पारितोषिक 25000/-₹ आणि चषक उत्तेजनार्थ 1111/- ₹ दोन बक्षिसे आणि आकर्षक चषक, सामनावीर, मालिकविर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती. स्पर्धेतील मालिकावीर दर्शन बांदेकर, सामनावीर निखिल पारवे, उत्कृष्ट फलंदाज निखिल पारवे आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला सोहेल खान यांची निवड करण्यात आली. Cricket Tournament at Palshet
या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून कैलास पिळणकर यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांना सुनील जाक्कर, राकेश आगडे, प्रज्ञेश जाक्कर, तुषार पालशेतकर यांनी साथ दिली. स्कोरर म्हणून रजत पाटील, सुधीर दाभोळकर, अपूर्व पाटील, संजय वासावे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे धावते समालोचन साईराज दाभोळकर, निलेश पाटील, सुभाष सावंत, असिफ साल्हे यांनी केले. Cricket Tournament at Palshet
स्पर्धेतील सर्व चषक कै. किशोर जनार्दन पावरी यांचे स्मरणार्थ संतोष जनार्दन पावरी यांनी दिली. तुषार पाटील, विकास पाटील, दिनेश जाक्कर, सुनिल पाटील, जगदीश म्हातनाक विकास दाभोळकर, शेखर पटेकर आदींनी भरघोस देणगी देऊन प्रतिष्ठानला मदत केली. त्याबद्दल त्यांचे शाल श्रीफळ देऊन विशेष आभार व्यक्त करण्यात आले. खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष जनार्दन पावरी, दर्यावर्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री पांडूरंग काशिराम दाभोळकर, उपाध्यक्ष श्री गुरुनाथ पांडूरंग जाक्कर, सचिव श्री दिनेश काशिनाथ जाक्कर, कार्यकारणी सदस्य निलेश शंकर पाटील, महिला मंडळ अध्यक्षा सौ.मेघा निलेश पाटील, सौ. जलपरी त्रिगुण आगडे, विकास पांडूरंग दाभोळकर, सौ. कविता लक्ष्मण पटेकर सौ. जतिशा जगदीश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. Cricket Tournament at Palshet

ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विकास दाभोळकर, संजय वासावे, ज्ञानेश्वर पाटील, राजकुमार आगडे, जगदीश पाटील, प्रशांत होडेकर, रामा जाक्कर,गजानन म्हातनाक, प्रतिम वासावे,अरविंद पाटील, सुनिल पाटील, समीर पाटील आणि सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. Cricket Tournament at Palshet
