फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळ आयोजित
गुहागर, ता. 30 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धेला मोठया दिमाखात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उदघाटन नगरसेविका सौ. श्रीया सागर मोरे यांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण 30 संघांनी सहभाग नोंदविला आहे. दि. 28 जानेवारी पासून सुरु झालेल्या स्पर्धा पुढील 4 दिवस चालणार आहेत. Cricket tournament at Guhagar Khalchapat
उदघाटन सोहळ्याला गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी उपसरपंच रजनीनाथ वराडकर, गुहागर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रशांत मोरे, अमोल वराडकर (खोत), वसंत पावसकर, दशरथ आरेकर, महेंद्र वराडकर, अनिल गोयथळे, राज विखारे, विजय मोरे आदी उपस्थित होते. Cricket tournament at Guhagar Khalchapat

स्पर्धेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री सागर मोरे, उपाध्यक्ष श्री अनिकेत भोसले, सचिव रोहन विखारे, खजिनदार प्रितम वराडकर, सुरज वराडकर, मयुरेश पावसकर, समीर पेंढारी, विक्रांत आरेकर, सुयोग आरेकर, सुयोग गोयथळे, अनराज वराडकर, अभिजित मोरे, राज विखारे, निलेश लोखण्डे, मयुरेश पाटील, विष्णू होळंब, गणेश पावसकर हे मेहनत घेत आहेत. Cricket tournament at Guhagar Khalchapat
