गुहागर, ता. 01 : कै. प्रदीप आरेकर व कै. अरुण वराडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवार दिनांक ५ जुलै ते ६ जुलै २०२५ रोजी भव्य अंडरआर्म बॉक्स पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धा गुहागर खालचापाट जांगळेवाडी येथे पार पडणार आहेत. Cricket tournament at Guhagar


सदर स्पर्धेतील विजेत्या संघाला १० हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघाला ७ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, अंतिम सामन्यातील सामनावीर या सर्वांना चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धेची प्रवेश फी ८०० रुपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धेच्या प्रवेशासाठी नोंद सर्वेश वराडकर, यश लोखंडे, सागर पाडावे, साहिल लोखंडे, सिद्धार्थ वराडकर यांच्याकडे करावी. Cricket tournament at Guhagar