गुहागर, ता. 10 : श्री स्वामी समर्थ सेवा शनीमंदिर गासकोपरी येथे दि. 07 रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एकुण १६ संघ दाखल झाले होते. श्री स्वामी सेवेच्या वतीने अन्नदान, गरजूंना मदत, सेवेतील माउलींना मोफत रक्तदान शिबीर असे कार्यक्रम आयोजित केले जातात. Cricket tournament at Gaskopri

या स्पर्धेत विजेता संघ गुहागर येथील आर्वी ११ क्रिकेट संघ कर्दे व उपविजेता संघ गुहागर येथील निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी ठरला. विजेत्या संघास रोख रक्कम ११,१११/- व चषक तर उपविजेता संघास ७,७७७ /- व चषक देवून गौरविण्यात आले. Cricket tournament at Gaskopri

विजेता संघ आर्वी ११ क्रिकेट संघ कर्दे, या संघातील बेस्ट फलंदाज रोशन चाळके, मालिकावीर शर्मन येद्रे ठरला. उपविजेता संघ निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी या संघातील बेस्ट गोलंदाज स्वप्निल घाणेकर ठरला. आलेल्या क्रिकेट रसिकांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Cricket tournament at Gaskopri
