मार्गदर्शक; अप्पाराव घोलकर, सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक
रत्नागिरी, दि. 23 : महाराष्ट्र राज्य बिगरशेती सहकारी पतसंस्था. यांचे नियामक मंडळ यांचे निदेश अंमलबजावणी संदर्भाने पगारदार पतसंस्था व नागरी पतसंस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. Credit Union Workshop in Ratnagiri


शुक्रवार दि. २५ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात (Ratnagiri District Municipal Library) कार्यशाळा घेण्यात येईल. या कार्यशाळेसाठी सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, सचिव यांनी उपस्थित रहावे. यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून https://tinyurl.com/2r2h6de3 ऑनलाईन नावनोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. अथवा सबंधित सहाय्यक निबंधक यांच्याजवळ संपर्क साधावा. Credit Union Workshop in Ratnagiri
या कार्यशाळेस अप्पाराव घोलकर कोकण विभाग, सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी सर्व पतसंस्था (पगारदार पतसंस्थासह) यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे. Credit Union Workshop in Ratnagiri

