पुढील दोन्ही पाय तोडल्याची हि दुसरी घटना
गुहागर, ता.10 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीतील दीपक वाघे यांच्या पाळीव बैलावर अज्ञात व्यक्तीने भ्याड हल्ला केला असून बैलाचे पुढील दोन्ही पाय तोडल्याची घटना घडली आहे. ऐन शेती हंगामात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. एका महिन्यात ही दुसरी घटना आहे. Cowardly attack on animals
तवसाळ तांबडवाडीतील गुरे आजूबाजूच्या वाडीत व गावात गेली असता त्यांच्यावर काही लोकं त्यांना मारहाण करून जखमी करत आहेत. विशेषतः त्यांच्या पायावर जोरदारपणे मारहाण करून त्यांना चालता येणार नाही अशी अवस्था करून ठेवत असल्याची माहिती शेतकरी दीपक वाघे यांनी दिली. Cowardly attack on animals
तवसाळ येथील शेतकरी यांचा बैल (रंग काळा) गेले १२ दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वजण शोध घेत होते. अचानक १२ दिवसांनी बैलाची खबर लागताच त्या ठिकाणी त्यांच्याच बाजूला असणाऱ्या रोहिले गावातील जंगलात बैल बसलेला पाहिला. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे त्याचे दोन्ही पुढचे पाय तोडलेले होते. म्हणजे तो कधीच उभा राहु शकणार नव्हता अशा अवस्थेत करण्यात आली होती. Cowardly attack on animals
दरम्यान, शेतकरी दीपक वाघे यांनी अशी शंका व्यक्त केली की, कोणाच्या बागेत किंवा कोणाच्या दारुच्या भट्टीत बैल गेला असावा. त्याला बांधून त्याचे दोन्ही पाय तोडले असावे किंवा जंगलात डुक्करांसाठी लावलेल्या फासकीत अडकून त्याचे पाय तुटले असावेत. ऐन शेतीच्या हंगामात बैलाचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. असे वाईट कृत्य करणाऱ्या इसमाविरुध्द कठोर कारवाई झाली पाहिजे. अशाप्रकारचे वाईट कृत्य करणाऱ्या लोकांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी ते पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. Cowardly attack on animals
या माहितीचा Video पाहण्यासाठी इथे क्लिंक करा.
