रत्नागिरी, ता. 27 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे. तरीही या तालुक्यात न्यायालय नाही, याची सर्वांनाच खंत होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात हे न्यायालय सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. Court to be held in Mandangad

मंडणगड न्यायालयाला जिल्हा नियोजन समितीमधून २८ लाखाचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांची कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय चव्हाण व कोर्ट मॅनेजर श्री चूनावाला यांचे समवेत भेट घेतली. श्री सामंत यांनी तत्काळ निधीच्या मंजुरीकरिता नियोजन समितीसमोर ठेवण्याचा आदेश दिला. तर न्यायाधीश स्टेनोग्रफर व इतर २५ कर्मचाऱ्यांची पदे अर्थमंत्रालयातून मंजूर करून घेवू असा शब्द दिला. सध्या जिल्हा परिषदेने ॲक्टिविटी सेंटरची जागा १०० रू. या नाममात्र भाड्यावर दिली आहे. आज देशात १४ लाख वकील आहेत तर मंडणगड मध्ये १४ आहेत . २/३ महिन्यात मंडणगडमध्ये न्यायाकरिता न्यायालयाचे दरवाजे खुले होतील, तो दिवस न्यायालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. Court to be held in Mandangad

विद्यार्थी दशेत स्पृष्य हिंदुनी गाडीतून हाकलून दिलेले, अस्पृश्य म्हणून शाळेच्या एका कोपऱ्यात बसावे लागलेले, सार्वजनिक ठिकाणी सतत अपमान सहन कराव्या लागलेल्या बाबासाहेबानी ४२ साली मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जागा नाकारुन गोरगरीबांच्या न्यायाकरिता वकिलीचा मार्ग स्वीकारला होता. त्याची यावेळी आठवण येते . विश्वासार्हता, नैतिकता आणि प्रामाणिकपणा या मूल्यांवर आधारित चांगला वकील घडविणारी, नि:पक्षपाती न्यायाची उज्वल परंपरा जपू या. या न्यायाच्या वाटेवर चार पावले टाकता आली याचा आनंद व समाधान अपूर्व आहे. – ॲड विलास पाटणे Court to be held in Mandangad

