जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, ता. 15 : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील या निवडणुका सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगांने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन, सतर्क रहावे आणि दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. Coordination officers should be vigilant and fulfil their responsibilities
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने सर्व समन्वय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक घेण्यात आली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद्र बिरादार आदी उपस्थित होते. Coordination officers should be vigilant and fulfil their responsibilities

जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, एसएसटी, एफएसटी पथक तयार करा. आचारसंहिता कक्षानी 24,48 आणि 72 तासांमधील कार्यवाही करुन अहवाल द्यावा. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावरील नियोजन करुन आवश्यकतेनुसार आपल्या स्तरावर आदेश काढावेत. त्याचबरोबर समन्वय ठेवावा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्वांचा सूचनांचा अभ्यास सर्वांनी करावा, असेही ते म्हणाले. Coordination officers should be vigilant and fulfil their responsibilities
