• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीत तालुकास्तरीय सहकार प्रशिक्षण

by Ganesh Dhanawade
November 22, 2022
in Guhagar
102 1
0
Cooperative training

Cooperative training in Abloli

200
SHARES
571
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्ड आणि गुहागर तालुका कुणबी पतसंस्थेचा पुढाकार

आबलोली : महाराष्ट्र राज्य सहकार संघ पूणे अंतर्गत रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्ड, सहकार खाते आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुकास्तरीय एकदिवशीय सहकार सप्ताह प्रशिक्षण शिबीर उत्साहात (Cooperative training) संपन्न झाले.

            या प्रशिक्षण शिबीराच्या अध्यक्षस्थानी कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे हे होते. यावेळी माजी मुख्याधिकारी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ (Maharashtra State Co-operative Union) पूणेचे के. बी. कुंभार यांनी “सहकाराला वंदन करुया ” हि प्रार्थना म्हटली. रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाचे (Ratnagiri District Cooperative Board) जिल्हा सहकार विकास अधिकारी ए. आर. कळत्रे, माजी मुख्याधिकारी सहकारी संघ पूणे   के. बी. कुंभार यांनी या एक दिवशीय शिबीरात प्रथम आणि द्वितिय सत्रात मार्गदर्शन करताना सहकार नियमानुसार सहकार साप्ताह सहकार क्षेत्रात राबवताना कुणबी पतसंस्था , विविध पतसंस्था, मजूर सोसायट्या, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांनी आणि संचालक, सभासद, संपर्क प्रमूख यांनी हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडताना तसेच कर्ज देणे, कर्ज वसूली, वार्षीक सभेला सभासदांची उपस्थिती, क्रियाशिल व अक्रियाशिल सभासद याचबरोबर कुणबी पतसंस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख याबद्दलही मौलिक मार्गदर्शन केले. प्रत्येकाच्या शंकाचेही समाधान करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी पतसंस्था शाखा शृंगारतळीच्या उपाध्यक्षा सौ. संजना सावंत, मजूर सोसायटी कोतळूकचे उदय अर्जुन मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. (Cooperative training)

          यावेळी  गुहागर तालुका कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, जिल्हा सहकारी बोर्डाचे जिल्हा सहकार विकास अधिकारी ए. आर. कळत्रे , माजी मुख्याधिकारी महाराष्ट्र  राज्य सहकारी संघ पूणेचे के. बी. कुंभार , संचालक पांडूरंग पाते, प्रदिप बेंडल, राजेंद्र साळवी, उदय मोहिते, विलास गुरव, श्रीम. वनिता डिंगणकर, सौ. श्रावणी पागडे, अनंत पागडे, महादेव वणे, उदय गोरीवले, अमोल वाघे, श्री. कमलाकर, संजय गोताड आदी  उपस्थित होते. (Cooperative training)

               हे संपूर्ण प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी कुणबी पतसंस्थेचे कार्यलक्षी संचालक  अनिल घाणेकर, कर्मचारी  वैभव बागवे, सुशिल फडकले, संजय आग्रे, सुलक्षणा भूवड, संतोष हुमणे, सृष्टी रेवाळे, संजय खापले यांनी विशेष परिश्रम घेतले.  (Cooperative training)

Tags: Cooperative trainingGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.