• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘कोकम करी’ थीम रेस्टॉरंटतर्फे पाककला महास्पर्धा

by Guhagar News
February 16, 2026
in Ratnagiri
52 1
0
Cooking competition in Ratnagiri
103
SHARES
294
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत

रत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील गृहिणी व पाककला प्रेमींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरीत नव्याने सुरू होत असलेल्या ‘कोकम करी’ या थीम रेस्टॉरंटच्या वतीने रत्नागिरी पाककला महास्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. पारंपारिक तसेच लुप्त होत चाललेल्या अस्सल कोकणी पदार्थांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत असून प्रत्यक्ष स्पर्धा बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. स्पर्धेचे स्थळ एलजी शोरूम शेजारी, जे. के. फाइल्स, रत्नागिरी येथे निश्चित करण्यात आले आहे. Cooking competition in Ratnagiri

ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मर्यादित असून शाकाहारी, मस्त्याहारी आणि मांसाहारी अशा तीन प्रकारांत स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये २१ हजार असून एकूण बक्षिसांची रक्कम रुपये ५१ हजार इतकी आहे. या स्पर्धेमुळे घरगुती चवीला व्यावसायिक व्यासपीठ मिळणार असून अनेकांसाठी छंदाला करिअरची दिशा मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी आयोजकांनी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Cooking competition in Ratnagiri

यासोबतच ‘कोकम करी’ रेस्टॉरंटमध्ये महिला आचारी (शेफ), सर्व्हिस स्टाफ आणि हाऊस किपिंग स्टाफ यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ही स्पर्धा मैत्री ग्रुप ऑफ बिझनेस, रत्नागिरी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली असून कोकम करी रेस्टॉरंट, हर्षा टेरेस गार्डन रेस्टॉरंट, हॉटेल सी फॅन्स (मांडवी), अंबर हॉल आणि सुरुची केटरर्स यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोकणच्या पारंपारिक चवीचा वारसा जपण्यासाठी आणि स्थानिक पाककलेला नवे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. Cooking competition in Ratnagiri

▪️स्पर्धेचा प्रकार – शाकाहारी | मस्त्याहारी | मांसाहारी.
▪️अर्ज करण्याची अंतिम तारीख : २२ फेब्रुवारी २०२६, वेळ दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
▪️स्पर्धा दिनांक : बुधवार दि.२५ फेब्रुवारी २०२६.
▪️स्थळ : LG शोरूम शेजारी, जे.के. फाइल्स, रत्नागिरी.

स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScsOx01bC-4LxnnjxL5IAGwmwonINJjp7O0E_KQuKo_6uDkpA/viewform?usp=dialog

अधिक माहितीसाठी संपर्क : 8010803302 /9370550302/ 9822290859 यावर संपर्क साधावा. Cooking competition in Ratnagiri

Tags: Cooking competition in RatnagiriGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share41SendTweet26
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.