गुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) महाविद्यालयाचा वर्ष २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांचा सहावा दीक्षांत सोहळा महाविद्यालयातील श्रीपती शैक्षणिक संकुलातील सभागृहामध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लोणेरे येथील बाटू विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. एम.ए. दाभाडे तसेच विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पवार उपस्थित होते. Convocation of Velneshwar College


शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी एकूण १७७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. Convocation of Velneshwar College
प्रमुख अतिथी डॉ. एम. ए. दाभाडे म्हणाले की, दीक्षांत समारंभ हे नेहमीच बौद्धिक परिपक्वतेचे प्रकटीकरण आणि कठोर परिश्रमांचे यश साजरे करण्याचा एक प्रसंग असतो. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये शिकणे हा जीवनशैलीचा अखंड भाग आहे. शिकणे शाश्वत आहे आणि अनुभव मौल्यवान आहे. चरित्र नसलेले ज्ञान हे सामाजिक दृष्ट आहे. म्हणून चांगले मार्क्स, भरपूर पैशा सोबत समाजात चांगले नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. Convocation of Velneshwar College


या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून परीक्षा विभागाचे विभागप्रमुख प्रा. शेखर सावंत यांनी काम पाहिले. यावेळी सर्व विभागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी, विभागप्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या प्रा. वैभवी मेठा यांनी काम पाहिले. Convocation of Velneshwar Colleges