गुहागर न्यूज : सण आणि उत्सव ही आपल्या देशाची ओळख आहे. दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, नवरात्री यांसारखे सण केवळ धार्मिक विधी नसून ते समाजाला एकत्र बांधणारे, सांस्कृतिक ओळख जपणारे आणि कोट्यवधी लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. तथापि, गेल्या काही वर्षांपासून एक कार्यप्रणाली दिसून येत आहे, ज्याद्वारे हिंदू सणांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. Conspiracy to distort Hindu festivals
दिवाळीत एका दिवस फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर वर्षभर चर्चा होते, पण ३६५ दिवस चालणाऱ्या औद्योगिक प्रदूषणावर सोयीस्कर मौन बाळगले जाते; जिथे होळीच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या पाण्याला ‘अपव्यय’ म्हटले जाते, पण आलिशान सोसायट्यांमधील स्विमिंग पूल आणि गोल्फ कोर्ससाठी लागणाऱ्या पाण्यावर कोणी प्रश्न विचारत नाही. यावरून हिंदू सणांना एका विशिष्ट वैचारिक अजेंड्याखाली लक्ष्य केले जात आहे, हे स्पष्ट होते. या वैचारिक हल्ल्याच्या मुळाशी ‘सांस्कृतिक मार्क्सवाद’ ही संकल्पना आहे, जी आपल्याच परंपरांबद्दल आपल्या मनात अपराध बोध निर्माण करते. Conspiracy to distort Hindu festivals
सांस्कृतिक मार्क्सवाद म्हणजे काय?
मूळ मार्क्सवादाने आर्थिक स्तरावर ‘शोषक’ आणि ‘शोषित’ असे वर्ग पाडले आहेत. तथापि मार्क्सवाद्यांच्या आर्थिक विचारांना आज जगाने नाकारल्यावर समाजाचे वर्गीकरण कुठल्या आधारे करायचे म्हणून समाजाची विभागणी सांस्कृतिक निकषांवर करण्याची कार्यपद्धती आज मार्क्सवाद्यांनी स्वीकारली आहे. त्यांच्या मते, धर्म, कुटुंब, परंपरा आणि संस्कृती या समाजातील शोषक संरचना आहेत आणि समाजाच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी या संरचना मोडून काढणे आवश्यक आहे. परंतु त्याला शक्तीअभावी थेट विरोध करण्याऐवजी समाजाच्या मनात स्वतःच्याच परंपरांबद्दल अपराध बोध आणि शंका निर्माण करण्याचे पद्धत आता डावे वापरताना दिसतात. Conspiracy to distort Hindu festivals
डाव्या विचारसरणीचे मुख्य आयुध म्हणजे ‘डीकंस्ट्रक्शन’ (Deconstruction) अर्थात ‘विखंडन’. याचा अर्थ, प्रत्येक परंपरेचा, विधीचा किंवा संकल्पनेचा विपर्यास करून त्यातील केवळ नकारात्मक किंवा शोषणाचे पैलू शोधायचे आणि तेच सत्य असल्याचे भासवायचे. उदा. ‘रक्षाबंधन’मधील भाऊ-बहिणीचे प्रेम आणि संरक्षणाची भावना नाकारून त्याला केवळ ‘पितृसत्तेचे प्रतीक’ म्हणणे, हे डीकंस्ट्रक्शनचे उत्तम उदाहरण आहे. Conspiracy to distort Hindu festivals
हिंदू सणांच्या विकृतीकरणाचे प्रमुख प्रवाह
पर्यावरणाचा नॅरेटिव्ह:
हा सर्वात जास्त वापरला जाणारा आणि प्रभावी नॅरेटिव्ह आहे. यानुसार, हिंदू सण हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहेत, असे चित्र निर्माण केले जाते.
दिवाळी : दिवाळीला ‘प्रदूषणाचा उत्सव’ म्हटले जाते. फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण यावर मोठा भर दिला जातो. मात्र, वर्षभर चालणारे औद्योगिक प्रदूषण, वाहनांचा धूर किंवा इतर कार्यक्रमांमधील फटाकेबाजी यावर सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.
होळी : होळीमध्ये ‘पाण्याचा अपव्यय’ होत असल्याचा प्रचार केला जातो. रासायनिक रंगांच्या वापराचा मुद्दाही उचलला जातो. यामागे पाण्याचे संरक्षण हा हेतू कमी आणि सणाचा उत्साह कमी करणे हा हेतू अधिक दिसतो.
गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा : मूर्ती विसर्जनामुळे जल प्रदूषण कसे होते, यावर लक्ष केंद्रित केले जाते. इको-फ्रेंडली मूर्तींचा पर्याय चांगला असला तरी, अनेकदा या मुद्द्याचा वापर मूळ उत्सवावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी होतो. Conspiracy to distort Hindu festivals
सामाजिक न्यायाचा आणि विषमतेचा नॅरेटिव्ह:
यानुसार, हिंदू सण हे सामाजिक विषमता आणि पितृसत्ताक पद्धतीला प्रोत्साहन देतात, असा युक्तिवाद केला जातो.
रक्षाबंधन आणि करवा चौथ:
या सणांना ‘पितृसत्ताक’ (Patriarchal) ठरवून स्त्रियांना दुय्यम स्थान देणारे म्हटले जाते. भावाने बहिणीचे रक्षण करणे किंवा पत्नीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करणे यातील भावनिक आणि सांस्कृतिक मूल्यांना नाकारून त्याला शोषणाचे प्रतीक म्हणून सादर केले जाते.
सणांमधील जातीयवाद:
काही सणांमध्ये विशिष्ट जातींना महत्त्व दिले जाते किंवा त्यातून जातीयवाद पसरतो, असा आरोप केला जातो. मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष करून सामाजिक फूट पाडण्याचा हा प्रयत्न असतो. Conspiracy to distort Hindu festivals
आर्थिक शोषणाचा नॅरेटिव्ह:
सणांवर होणारा खर्च हा ‘उधळपट्टी’ आणि ‘गरिबांचे शोषण’ आहे, असे म्हटले जाते. सणांमुळे काही मोठ्या व्यापाऱ्यांचाच फायदा होतो आणि सामान्य माणूस कर्जबाजारी होतो, असे चित्र उभे केले जाते. या युक्तिवादात सणांमुळे फुलवाले, मिठाईवाले, मूर्तिकार, छोटे दुकानदार आणि स्थानिक कारागीर यांच्यासारख्या कोट्यवधी लोकांना मिळणाऱ्या रोजगाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. सण हे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना देतात, हे सत्य लपवले जाते.
प्राणी हक्कांचा नॅरेटिव्ह:
ज्या सणांमध्ये किंवा परंपरांमध्ये प्राण्यांचा सहभाग असतो, त्यांना ‘क्रूर’ आणि ‘अमानवी’ ठरवले जाते. जल्लीकट्टू, बैलगाडा शर्यती किंवा सणांच्या मिरवणुकीत हत्ती-घोड्यांचा वापर यावर प्राणी हक्कांच्या नावाखाली बंदी घालण्याची मागणी केली जाते. यामागे अनेकदा निवडक लक्ष्य (Selective Outrage) दिसून येते, जिथे इतर कारणांसाठी होणाऱ्या प्राण्यांच्या हत्येवर मौन बाळगले जाते.
यामागील उद्देश आणि परिणाम
या सर्व नॅरेटिव्हचा मुख्य उद्देश हिंदू समाजात आपल्याच संस्कृतीबद्दल एक प्रकारचा अपराध बोध आणि न्यूनगंड निर्माण करणे हा आहे. “आपले सण कालबाह्य, प्रतिगामी, निसर्गविरोधी आणि शोषण करणारे आहेत,” असा विचार तरुणांच्या मनात रुजवण्याचा हा एक पद्धतशीर प्रयत्न आहे. याचा परिणाम म्हणजे हिंदू तरुण पिढी आपल्या सणांपासून आणि परंपरांपासून दूर जाते, सांस्कृतिक ओळख पुसट होते आणि समाजाला एकत्र बांधणारे धागे कमकुवत होतात.
जागतिक स्तरावर परिणाम
हिंदू सण हे भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आहेत. योग, आयुर्वेद यांप्रमाणेच दिवाळी आणि होळी हे सण जगभरात साजरे केले जातात. या सणांची प्रतिमा मलिन करणे, म्हणजे भारताच्या सांस्कृतिक प्रभावाला (Soft Power) कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. अनेकदा आंतरराष्ट्रीय माध्यमे ‘हिंदूफोबिया’ (Hinduphobia) अर्थात हिंदूद्वेषातून प्रेरित होऊन या सणांना ‘रानटी’, ‘अवैज्ञानिक’ आणि ‘पर्यावरणविरोधी’ ठरवतात आणि भारतीय माध्यमे त्याच वृत्तांकनाचा आधार घेऊन आपल्या देशात चर्चा घडवून आणतात. Conspiracy to distort Hindu festivals
मीडियाची भूमिका
प्रसारमाध्यमे, विशेषतः डिजिटल मीडिया आणि इंग्रजी वृत्तवाहिन्या, या नॅरेटिव्हना लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. निवडक वृत्तांकन (Selective reporting): सणांच्या दिवशी होणाऱ्या प्रदूषणाच्या बातम्यांना अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. मात्र, तेच सण स्थानिक अर्थव्यवस्थेला कशी चालना देतात, यावर फारसे बोलले जात नाही. अपराध बोध निर्माण करणारे मथळे: “दिवाळीच्या धुराने गुदमरली दिल्ली,” “होळीच्या पाण्याने दुष्काळात भर,” यांसारखे मथळे वापरून नकारात्मक भावना निर्माण केली जाते. अशावेळी विशिष्ट विचारसरणीचे समाजशास्त्रज्ञ आणि कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांच्या माध्यमातून या नॅरेटिव्हना वैचारिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो.