श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेची सामाजिक बांधिलकी
गुहागर, ता. 03 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेस जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट देण्याचा जिल्हा वार्षिक योजनाअंर्गत उपक्रमशिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी नासा – इस्त्रो संस्थांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची अतिम निवड यादी जाहीर झाली आहे. इस्त्रोसाठी गुहागर शहरातील जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १ चा विद्यार्थी सोहम समीर बावधनकर याची निवड झाली आहे. या निवडीबद्दल ग्राहकांना तत्पर आणि विनम्र सेवा देणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण, शाखा गुहागर यांच्यावतीने सोहम याचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. Congratulations to Soham selected for ISRO
श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचा नेहमीच शैक्षणिक व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. पतसंस्थेचे चेअरमन श्री. प्रभाकर आरेकर यांच्या सूचनेनुसार सोहम याला पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा सत्कार गुहागर शाखेच्या वतीने करण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक राकेश गोयथळे, कर्मचारी सौरभ गोयथळे, गणेश होळम, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, पिग्मी एजंट शिवानी ओक, अमृता जोशी, मंदार गोयथळे, समीर बावधनकर, सही बावधनकर आदी उपस्थित होते. Congratulations to Soham selected for ISRO