गुहागर, ता. 26 : तेलीआळी येथील रहाटे परिवाराच्या वतीने कुलस्वामिनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगणात पार पडला. तसेच देवीचा जोगवा म्हणून पाच घरांमध्ये जाऊन जोगवा मागण्यात आला. Confusion of Bhairi Bhavani Devi in Guhagar


या कार्यक्रमात श्री भैरी भवानी कुलस्वामिनी या देवतांचे पूजन करण्यात आले. तद्नंतर सुवासिनी व कुमारिका यांचे पूजन करण्यात आले. गुहागरची ग्रामदेवता श्री भैरी व्यांघ्राबरी देवी मंदिर तेलीआळी येथील पाच घरांमध्ये जाऊन जोगवा मागण्यात आला. देवीचा जोगवा मागण्यासाठी रहाटे परिवार उपस्थित होते. सायंकाळी चौक भरण कार्यक्रम करण्यात आला. कुलस्वामी भैरी भवानी देवीचा मांड भरण्यात येऊन फुलांनी सजविण्यात आले. देवीच्या मांडाची पूजन करण्यात आले. देवीच्या दिवट्या प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर कमलाकर सीताराम रहाटे यांच्या घरातून कुलस्वामिनी देवतेचा देव्हारा गोंधळ स्थळी आणण्यात आला. दिवटी हातात घेऊन नाचण्याचा आनंद रहाटे परिवार व मित्र परिवार यांनी घेतला. रात्री कथा व गोंधळ गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. Confusion of Bhairi Bhavani Devi in Guhagar
या कार्यक्रमासाठी शेकडो भाविक उपस्थित होते. या गोंधळ कार्यक्रमासाठी रमेश रहाटे, जगदीश रहाटे, महेश शंकर रहाटे, सुनील रहाटे, प्रथमेश रहाटे, अक्षय रहाटे, विशाल रहाटे, सचिन रहाटे, संतोष रहाटे, महेश सखाराम रहाटे, प्रामाणिक रहाटे, दिलीप रहाटे व परिवार यांनी मेहनत घेतली. Confusion of Bhairi Bhavani Devi in Guhagar