ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूलतर्फे दि. 16 रोजी आयोजन
गुहागर. ता. 13 : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड ( रत्नागिरी ) संचालित ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव व ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल, मोरवंडे – बोरज मध्ये JEE, NEET, CET व स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ज्ञानदीप विद्या संकुल, मोरवंडे – बोरज येथे व सायंकाळी ठीक 4:00 वा. ज्ञानदीप विद्या संकुल भडगाव – खोंडे येथे आयोजित करण्यात आले आहे. Competitive exam guidance at Khed

सदर मार्गदर्शन शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. महेश अभ्यंकर, वैद्यकीय सल्लागार, औषध आणि रणनीती तज्ज्ञ, लेखक, संशोधक व NEET/JEE यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे समुपदेशक आहेत. तरी सदर मार्गदर्शन शिबिराचा इ. 10 वी 11 वी व 12 वी Science च्या सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच रायगड – रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधीतांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. अरविंद तोडकरी यांनी केले आहे. Competitive exam guidance at Khed

