गुहागर तालुका कुणबी कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजन
गुहागर, ता. 03 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी यांच्या विद्यमाने व गुहागर तालुका कुणबी कर्मचारी संघटनेच्यावतीने या वर्षाच्या दुस-या सत्रातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमे रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वा. गुहागर बाजार भवन, लोकनेते माजी आमदार स्व. रामभाऊ बेंडल सभागृह, शृंगारतळी ता. गुहागर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मार्गदर्शन शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संदिप एन. पाटील (प्रकल्प संचालक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व करिअर समुपदेशक) तर प्रमुख अतिथी म्हणून अनंत सोनू डिंगणकर (गुहागर-चिपळूण समन्वयक), ओंकार तिवरेकर(सदस्य-गुहागर) हे असणार आहेत. Competitive Exam Guidance

गुहागर तालुका कुणबी कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रतिवर्षी समाजातील गरीब व पुढील शिक्षण घेण्यासाठी अडचण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आर्थिक रोख मदत देण्यात येते. तालुक्यातील कुणबी कर्मचार्यांचे संघटन करून त्यांनी जमा केलेल्या आर्थिक निधीतून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजातील गरजू, गरीब व हुशार विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना मदत देण्याचे कार्य संघटना मागील काही वर्षापासून करीत आली आहे. आजवर अनेक गरजूंना अशी मदत करुन कृतज्ञतेचा आनंद संघटनेस मिळाला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, महसूल व ग्रामपंचायत स्तरावरील प्रश्नांबाबत कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन, वधू-वर सूचक मंडळ, शास्त्रीय अभ्यास कार्यशाळा, आकस्मिक आपत्तीत सापडलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत व गरजूंना शासकीय योजनांच्या लाभाकरिता सहकार्य इ. उपक्रम संघटनेमार्फत राबविले जातात. या सेवाभावी कार्यासाठी कर्मचारी बंधू-भगिनींनी सामाजिक जाणीवेतून अत्यंत आपुलकीने मदत केली आहे. Competitive Exam Guidance
तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी मंडळ, गुहागर तालुका कुणबी कर्मचारी संघटना यांनी केले आहे. Competitive Exam Guidance
