शासकीय अधिकारी रेडेकर यांचा सुट्टीच्या दिवसातील उपक्रम
गुहागर, ता. 13 : तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळी अंतर्गत चिपळूण, गुहागर दापोली, खेड येथे नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली आहे. या संस्थेचे सत्यवान रेडेकर हे 4 दिवसांत 5 तालुक्यातील 8 शाळांमध्ये मोफत मार्गदर्शन करणार आहेत. Competitive Exam Guidance


भारत सरकारच्या सीमाशुल्क विभागात मुंबईमध्ये कनिष्ठ अनुवाद म्हणून सत्यवान रेडेकर नोकरी करतात. कोकणातील मुलांना शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा, संधी, प्रवेश परिक्षांची माहिती मिळावी म्हणून तिमिरातुनी तेजाकडे या संस्थेद्वारे काम करतात. Competitive Exam Guidance


या आठवड्यात 14 एप्रिल पासून 17 एप्रिल पर्यंत शासकीय सुट्ट्या आणि दुसरा शनिवार असल्याने नोकरीतून त्यांना 4 दिवस काढता येणार आहेत. त्यामुळे या चार दिवसात चिपळूण, गुहागर, दापोली आणि खेड मधील माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याचे त्यांनी नक्की केले आहे. Competitive Exam Guidance
गुरुवार, ता. १४ एप्रिलला सकाळी ९.३० वा. न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर कॉलेज खेर्डी, चिंचघरी सती, (ता. चिपळूण) दुपारी २.०० वा. ग्रामपंचायत आंबवली (तालुका खेड), शुक्रवार, ता. १५ ला गुहागर तालुक्यात सकाळी ९.०० वा. श्री सोमनागेश्वर मंदिर तळवली आणि दुपारी १.०० वा. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, शनिवार, ता. १६ ला सकाळी ९.०० वा. साने गुरुजी विद्यामंदिर पालगड (ता. दापोली) दुपारी २.०० वा. भाटे विद्यामंदिर, वेसवी (ता. मंडणगड) रविवार, ता. १७, खेड तालुक्यातील सकाळी ९.०० वा. एल. पी. इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, खेड आणि दुपारी १.०० वा. समर्थ कृपा इंग्लिश मीडियम (CBSE) स्कूल व ज्युनियर कॉलेज वेरळ, या ठिकाणी ते प्रवास करणार आहेत. Competitive Exam Guidance
संबंधित तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या शाळा, महाविद्यालये, अन्य ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित रहावे. असे आवाहन रेडेकर यांनी केले आहे. Competitive Exam Guidance