• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दाभोळ आयटीआयमध्ये रमजान ईद निमित्त स्पर्धा

by Guhagar News
May 12, 2022
in Guhagar
17 0
0
Competition for Ramadan Eid at Dabhol ITI
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

हमद बीन जासिम औद्योगिक संस्थेत ईद मिलन कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

गुहागर, ता. 12 : दाभोळ येथे रमजान ईद चे औचित्य साधून हमद बीन जासिम औद्योगिक खासगी प्रशिक्षण संस्थेत ईद मिलन कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या संस्थेच्या वतीने  घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये 200 मीटर धावणे, हॉलीबॉल व क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये पोलीस कर्मचारीही सहभागी झाले होते. Competition for Ramadan Eid at Dabhol ITI

या 200 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक नवेद चिपळूणकर, द्वितीय क्रमांक वितेश कदम तर तृतीय क्रमांक साद चिपळूणकर यांनी पटकावले. हॉलीबॉल स्पर्धा या दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या मैदानावर खेळविण्यात आल्या होत्या. यामधे चार संघ सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी वर्गाने सुद्धा या स्पर्धेत सहभागी होत हमद बिन जासिम संस्थेच्या संघावर मात करत हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर संस्थेच्या संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. Competition for Ramadan Eid at Dabhol ITI

Competition for Ramadan Eid at Dabhol ITI

तसेच विजतंत्री प्रथमवर्ष यांनी संधाता प्रथम वर्ग वर मात करत क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून करण डोरकूलकर, उत्कृष्ट गोलंदाज नितीन सावरकर, मालिकावीर रोहित गोरीवले आदिना आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Competition for Ramadan Eid at Dabhol ITI

यावेळी संस्था संचालक कमाल मांडलेकर, दाभोळ सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, जमातुल मुस्लीम मोहल्ला वणकर चे अध्यक्ष गुलजारभाई खतीब, आयटीआय प्रिन्सिपल उस्मान खान, उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक नजीर हसन, चांद खतीब, दिलीप तवसाळकर, विनायक कुडाळकर, दिलदार वनकर, हशमत चौगले, नजमा खतीब आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश रहाटे यांनी केले. तर संस्थेच्या कर्मचारी वर्गाने स्पर्धा यशस्वीतेसाठी खूप परिश्रम घेतले. Competition for Ramadan Eid at Dabhol ITI

Tags: Competition for Ramadan Eid at Dabhol ITIGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.