साकेत गुरव व स्वरा पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला
गुहागर, ता. 06 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. या निमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. सदरच्या स्पर्धेत प्राथमिक गटामध्ये साकेत समीर गुरव -५ वी, प्रथम क्रमांक, दुर्वा दशरथ नाटेकर – ७ वी, द्वितीय क्रमांक, निधी सुनिल रांजाणे – ६वी, तृतीय व सान्वी शैलेंद्र खातू ६वी हिने उत्तेजनार्थ क्रमांकाचे सुयश संपादन केले. Competition concluded at Guhagar High School

तसेच माध्यमिक गटामध्ये स्वरा मंगेश पाटील ९वी, प्रथम क्रमांक, आर्या गणेश झगडे द्वितीय क्रमांक तसेच सोहम समीर बावधनकर व श्रेयस ज्ञानेश्वर झगडे – ८वी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. Competition concluded at Guhagar High School
सर्व विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी शिक्षक पी.बी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सुयशस्वी विद्यार्थ्याचे गुहागर एज्युकेशन सोसायटी व शालेय प्रशासनाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. सौ.यु.पी.कांबळे, सौ.जे. एम.माने, श्री.पी.बी.जाधव व सौ.एस.एस.ठाकूर यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. Competition concluded at Guhagar High School