श्री. संतोष वरंडे; पाटपन्हाळे महाविद्यालयात कॉमर्स फेस्टचे आयोजन
गुहागर, ता. 04 : आपण ज्या ठिकाणी शिकलो त्या शाळा आणि महाविद्यालयाचे ऋण आपण कधीच विसरू नका. ज्यांनी आपल्याला भरभरून दिले त्यांना आपण काहीतरी देणे लागतो. हे सर्व विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन संतोष वरंडे यांनी केले. पाटपन्हाळे महाविद्यालयामध्ये कॉमर्स फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. कॉमर्स फेस्टमध्ये एकूण चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. Commerce Fest organized at Patpanhale College
या कॉमर्स फेस्टचे बक्षीस संतोष वरंडे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्याचे युगामध्ये तंत्रज्ञानामुळे खूप मोठे बदल होत आहेत. त्यामुळे आपण आपल्या क्षेत्रात कितीही मोठे झालो तरी सतत नवनवीन शिकण्याची वृत्ती प्रत्येकाने कायमस्वरूपी ठेवावी. कॉमर्स फेस्ट या स्पर्धेचे आयोजन करणारे हे कोकणातील एकमेव महाविद्यालय आहे. या स्पर्धेला विद्यार्थ्यांना एकूण 33 हजार पाचशे रुपयाची बक्षिसे, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली. Commerce Fest organized at Patpanhale College

कॉमर्स क्विझ या स्पर्धेमध्ये ज्युनिअर गटामध्ये डांगे दैविक, भेकरे सिद्धी, नाटेकर ओम यांनी तर सिनियर गटामध्ये विचारे जान्हवी, काताळकर साहिल, बोटके प्रणव यांनी तसेच पावर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये कारेकर नुपूर, कुंडलिक मरूफ, आग्रे साहिल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. ऍडमॅड शो या स्पर्धेमध्ये पाटपन्हाळे जुनिअर कॉलेजच्या अपेक्षा टानकर यांच्या ग्रुपने तृतीय क्रमांक, टी वाय बी कॉम च्या सानिका पागडे ग्रुपने द्वितीय क्रमांक आणि एस वाय बी कॉम च्या निखिल टाणकर यांच्या ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला. या कॉमर्स फेस्ट चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मार्केटिंग स्पर्धा होती. विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या दिवशी विविध गावांमध्ये आणि बाजारपेठेमध्ये जाऊन मार्केटिंग केले. यासाठी एकूण महाविद्यालयातील 24 ग्रुपने 28 वस्तूंची एकूण पाच लाख 80 हजार विक्री केली आणि त्याचे सादरीकरण महाविद्यालयामध्ये केले. यातील बहुतांश वस्तू विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्या होत्या.

या स्पर्धेमध्ये बेस्ट सेल्स म्हणून प्रथम वर्ष वाणिज्य मधील जागृती टाणकर यांनी तर बेस्ट सेलर म्हणून साहिल आग्रे यांच्या ग्रुपने क्रमांक मिळवला. एस वाय बी कॉम च्या साक्षी पवार यांच्या ग्रुपने साडीचे मार्केटिंग करून तृतीय क्रमांक तर एफ वाय बी कॉम च्या विद्यार्थ्यांनी मोदकाचे मार्केटिंग करून दुसरा क्रमांक तसेच भाजीपाल्याचे मार्केटिंग करणारा साहिल काताळकर ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला. मोदकाचे मार्केटिंग करणाऱ्या ग्रुपने गुहागर बीचवर स्टॉल टाकून आपली विक्री केले होती तसेच भाजीपाल्याचे मार्केटिंग करणाऱ्या ग्रुपने स्वतःच्या शेतामध्ये भाजीपाला तयार केला आणि त्याचे मार्केटिंग केले आणि त्यातून आपल्याला एक चांगल्या स्वयंरोजगाराची संधी निर्माण केली. या स्पर्धेमध्ये अंजनवेल, पालशेत, वेळणेश्वर, पाटपन्हाळे ज्युनिअर कॉलेज, नवनिर्माण कॉलेज, संगमेश्वर, डी बी जे महाविद्यालय यांनी सहभाग नोंदवला. Commerce Fest organized at Patpanhale College
बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी पाटपन्हाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई, अंजनवेल जुनियर कॉलेजचे प्राचार्य मंगेश गोरिवले, शृंगारतळी येथील प्रसिद्ध उद्योजक अमिष कदम, श्री. राहुल शेटे, पाटपन्हाळे ज्युनिअर कॉलेजचे प्रा. संजीव मोरे, महाविद्यालयाचा जी एस साहिल आग्रे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुभाष खोत, कांचन कदम, प्राध्यापक डी वाय पारखे, प्रा. सौम्या चौगुले, ग्रंथपाल डी डी गुरव आणि महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. Commerce Fest organized at Patpanhale College
