• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोलंबो सुरक्षा परिषदेची आभासी बैठक

by Mayuresh Patnakar
April 20, 2022
in Bharat
16 0
0
Colombo Security Conclave
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या तपासासंदर्भात; 5 देशांतील विषयतज्ञ आणि प्रतिनिधी

गुहागर ता. 20 : दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या तपासादरम्यान आलेले अनुभव सामायिक करण्याच्या उद्देशाने भारतीय तपास संस्थेने 19 एप्रिल 2022 रोजी कोलंबो सुरक्षा परिषदेच्या आभासी बैठकीचे आयोजन केले. भारत, मालदीव, मॉरीशस, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांतील विषयतज्ञ आणि प्रतिनिधी या आभासी बैठकीत सहभागी झाले.

मालदीव येथे 9 आणि 10 मार्च 2022 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पाचव्या बैठकीमध्ये सदस्य देशांनी मंजूर केलेल्या कोलंबो राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या 2022-23 या वर्षासाठी सहकार्य आणि उपक्रमविषयक आराखड्यात निश्चित करण्यात आलेल्या अनेक एकत्रित उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे ही परिषद होय. Colombo Security Conclave

या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या देशांच्या प्रतिनिधींनी आपापल्या देशांतील दहशतवादाशी संबंधित विविध आव्हानांविषयी चर्चा केली आणि दहशतवादाशी संबंधित खटल्यांचे अनुभव, परदेशी हल्लेखोरांचा सामना करताना वापरण्याची धोरणे आणि इंटरनेट तसेच समाजमाध्यमांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठीचे उपाय यासंदर्भातील अनुभव सामायिक केले. बैठकीमध्ये उपस्थित तज्ञांनी दहशतवादी आणि मूलतत्ववाद्यांशी संबंधित प्रकरणांचा परिणामकारक तपास आणि खटल्यांच्या कार्यवाहीसाठी,  कोलंबो सुरक्षा परिषदेचे सदस्य तसेच निरीक्षक देशांदरम्यान अधिक सखोल सहकार्य आणि समन्वय साधण्यावर भर दिला. Colombo Security Conclave

Colombo Security Conclave

कोलंबो सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून दहशतवाद आणि मूलतत्ववाद यांना अटकाव करण्याच्या बाबतीत सहकार्य यापुढेही कायम ठेवण्यासाठी विशिष्ट कार्यक्षेत्रे निश्चित केली पाहिजेत याबद्दल सहभागी देशांनी सहमती नोंदविली. Colombo Security Conclave

Colombo Security Conclave

The Colombo Security Conclave Virtual Conference on Sharing of experiences in investigation of terrorism cases was organised by the National Investigation Agency of India on 19 April 2022. Panellists and participants from India, Maldives, Mauritius, Sri Lanka and Bangladesh participated in the virtual conference.

The conference was one of the engagement activities identified in the Colombo Security Conclave’s Roadmap for Cooperation and Activities for 2022-23 agreed by member countries at the 5th NSA level Meeting held in Maldives on 9-10 March 2022.

Participants discussed the various challenges related to terrorism in their respective countries and shared experiences on prosecution of terrorism cases, strategies to deal with foreign fighters and countering the misuse of internet and social media. Panellists emphasised on the need for closer cooperation and coordination among member and observer countries of the Colombo Security Conclave for effective investigation and prosecution of terrorism and radicalisation related cases. Participants agreed to identify specific areas to take forward the cooperation on countering terrorism and radicalisation under the Colombo Security Conclave.

Tags: BangladeshColombo Security ConclaveGuhagarGuhagar NewsIndiaInvestigation of Terrorism CasesLatest Marathi NewsLatest NewsMaldivesMarathi NewsMauritiusNews in GuhagarSri Lankastrategiesterrorismटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.