परिवारासह अनुभवले खेड्यातील कृषी पर्यटन
गुहागर, ता. 18 : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन.पाटील परिवारासह गुहागरच्या खासगी दौऱ्यावर आले होते. त्यांनी परचुरीतील आजोळ कृषी पर्यटन केंद्र आणि मुंढरमधील मामाचा गांव कृषी पर्यटन केंद्रात राहून ग्रामीण भागातील पर्यटनाचा आनंद लुटला. अनेकवेळा वरिष्ठ अधिकारी सुट्टीचा कालावधी निवांतपणे घालवण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेरील ठिकाण निवडतात. मात्र रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पाटील यांनी कार्यक्षेत्रातील ठिकाण निवडले. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. Collector Patil in Guhagar


जिल्हाधिकारी म्हणजे एका अर्थाने जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभागांचा कप्तान. सहाजिकच अशा व्यक्तीचा जिल्ह्यातील खासगी दौरा ही महत्वपूर्ण असतो. थेट प्रशासकीय कामकाज झाले नाही तरी आपल्या जिल्ह्यातील जनता कशी रहाते, येथील व्यावसायिकांच्या समस्या काय, प्रशासनाकडून अपेक्षा काय. याची चर्चा, निरीक्षण अशा दौऱ्यांमुळे होते. Collector Patil in Guhagar


जिल्हाधिकारी पाटील यांच्या गुहागरमधील कृषी पर्यटन दौर्यात खाडी किनारी पर्यटन विकासाबाबत अनौपचारिक चर्चा झाली. परचुरीतील आजोळ पर्यटन केंद्राचे मालक सत्यवान देर्देकर यांनी पाटील परिवाराला मगर सफर, उन्हवरे येथील गरम पाण्याचे झरे, खाडी किनार्यावरील पक्षी निरीक्षण, खाडी सफर घडवली.


त्यावेळी कांदळवन संरक्षणातील समस्या, रोजगार निर्मिती साठी कांदळवनात मधुमक्षिका पालन, खेकडे व मासे पालन यावर सकारात्मक चर्चा झाली. दाभोळ खाडीतील पर्यटन वाढविण्यासाठी केरळच्या धर्तीवर हाऊसबोट, फ्लोटिंग रेस्टॉरंट याबाबत चर्चा झाली. यामुळे खाडी किनाऱ्यालगत असलेल्या गावांना पर्यटनातून कसा रोजगार उपलब्ध होवू शकतो याची माहिती सत्यवान देर्देकर यांनी दिली. Collector Patil in Guhagar


कांदळवनातील मधुमक्षिका पालनासाठी कांदळवन प्रतिष्ठान, वन विभाग यांच्या सहकार्याने महिला बचतगटांना व्यवसाय करण्यास परवानगी देता येईल. असे यावेळी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी सांगितले. Collector Patil in Guhagar