• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हातिस येथे नारळ बागायतदारांचा मेळावा

by Guhagar News
May 21, 2022
in Ratnagiri
16 1
0
Coconut Growers' Gathering at Hatis
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 21 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि तालुक्यातील हातिस येथे कल्पवृक्ष लागवडीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या २२ मे रोजी हातिस येथे नारळ बागायतदारांचा मेळावा आयोजित केला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पीर बाबरशेख मंदिर परिसरात मेळावा होईल. मेळाव्यानिमित्त नारळ झाडावर चढणे व झाप विणण्याची स्पर्धा २१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. Coconut Growers’ Gathering at Hatis

हातिस ग्रामविकास मंडळ (हातिस व मुंबई), नारळ विकास मंडळाचे ठाणे केंद्र, दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University), कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि भारत अॅग्रो सर्व्हिसेस (कोल्हापूर) (Bharat Agro Services Kolhapur) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. Coconut Growers’ Gathering at Hatis

मेळाव्यात सकाळी ९ वाजता नारळापासून खाद्यपदार्थ स्पर्धा, सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन, तज्ञांचे मार्गदर्शन, सकाळी ११ वाजता स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण, विशेष सत्कार, दशक्रोशीतील सरपंचांना नारळ रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. Coconut Growers’ Gathering at Hatis

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, (Higher and Technical Education Minister Uday Samant), खासदार विनायक राऊत(MP Vinayak Raut)  यांच्यासह माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी आमदार बाळ माने (Former MLA Bal Mane), माजी पं. स. सभापती कुमार शेट्ये, मरीनर दिलीप भाटकर, माजी जि. प. सदस्य सौ. देवयानी झापडेकर, माजी सदस्य दत्तात्रय उर्फ बाबू मयेकर, नारळ विकास मंडळाचे उपसंचालक डॉ. अमिय देवनाथ, जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे, कृषी विकास अधिकारी विजय पोकळे आणि टेंभ्ये-हातिसच्या सरपंच सौ. कांचन नागवेकर उपस्थित राहणार आहेत. Coconut Growers’ Gathering at Hatis

कार्यक्रमासाठी अध्यक्ष दिवाकर नागवेकर, उपाध्यक्ष सत्यवान नागवेकर, कार्याध्यक्ष नरेंद्र नागवेकर, चिटणीस भालचंद्र नागवेकर, आशिष नागवेकर, महेश कीर, अनंत नागवेकर, प्रसाद नागवेकर, बिल्वमंगल नागवेकर, ऋषिकेश नागवेकर, अक्षय नागवेकर आणि सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. Coconut Growers’ Gathering at Hatis

Tags: Coconut Growers' Gathering at HatisGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.