रत्नागिरी, ता. 26 : नारळ लागवड करून त्याच्या विविध भागापासून विविध पदार्थांची निर्मिती करून त्याला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष करूया. आणि नेहा पालकर या माडावर चढणाऱ्या मुलींचा आदर्श घ्यावा, असे आवाहन डॉ. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी केले. तसेच पोमेंडी खुर्द येथील शेतीफार्मचा एक हजार नारळ लागवड करणारे राजेंद्र कुंभार यांचा हातिस ग्रामस्थांच्यावतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. Coconut Grower Meet held at Hatis


भारतीय स्वातंत्र्याचा आणि हातिस येथील कल्पवृक्षाच्या लागवडीचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हातिस ग्रामविकास मंडळ (हातिस आणि मुंबई) आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने नारळ बागायतदार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कद्रेकर बोलत होते.
डॉ. नागवेकर यांच्या वतीने पोमेंडी खुर्द, सोमेश्वर, टिके, टेंभ्ये, कुरतडे या ग्रामपंचायतींना नारळरोपांचे वाटप करण्यात आले. पोमेंडी खुर्द येथील शेतीफार्मचा एक हजार नारळ झाडे लागवड करून कायापालट करणारे राजेंद्र कुंभार व ७५ वर्षावरील ग्रामस्थ लिलाकांत नागवेकर, उत्तम नागवेकर, जयवंत नागवेकर आणि विजय नागवेकर यांचा हातिस ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. Coconut Grower Meet held at Hatis
या वेळी माजी सभापती कुमार शेटये, मरिनर दिलीप भाटकर, पंचायत समिती रत्नागिरी माजी सदस्य महेंद्र झापडेकर, सरपंच कांचन नागवेकर, हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर आणि मुंबईचे अध्यक्ष शंतनू नागवेकर प्रमुख उपस्थित होते. शेटये यांनी शास्त्रीय पद्धतीने नारळ लागवड करावी, असे आवाहन करून हातिस ग्रामस्थांनी पीर बाबरशेख मंदिराचा पर्यटनाच्यादृष्टीने फायदा करून घ्यावा, असे सुचवले. नारळ लागवड तंत्रज्ञान आणि प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन डॉ. दिलीप नागवेकर आणि स्वराज ॲग्रोचे संस्थापक अध्यक्ष तुषार आग्रे यांनी केले. Coconut Grower Meet held at Hatis


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, उपाध्यक्ष सत्यवान नागवेकर, सचिव भालचंद्र नागवेकर, सरचिटणीस आशिष नागवेकर, बिल्वमंगल नागवेकर, अक्षय नागवेकर, करण नागवेकर, मिहीर नागवेकर, चिन्मय नागवेकर, महेश तोडणकर, ग्रामस्थ राजू नागवेकर, संदेश नागवेकर, मानकरी प्रमोद नागवेकर, उपेंद्र नागवेकर, जयवंत धोंडू नागवेकर आणि विजय नागवेकर, दीपक आंबुलकर, धोंडू नागवेकर, पोलिस पाटील संतोष नागवेकर यांनी सहकार्य केले. Coconut Grower Meet held at Hatis