जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 25 : कोकण म्हणजे नारळी आणि पोफळी चे माहेरघर उंच उंच नारळाची आणि पोफळीची झाडे पाहून कोकणचे वैभव अधिक वाढते पण याच झाडावर चढणारे व नारळ सुपारी पाडून झाड सफाई करणारे कुशल कामगार मिळणे मुश्कील झाले आहे. कोकणातील गुहागर, दापोली, रत्नागिरी सह अन्य ठिकाणी नारळाच्या बागा मोठ्या आहेत. यासाठी बळीराज सेनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी हा व्यवसाय एक उत्तम रोजगार म्हणून पहात कोकणातील कृषी क्षेत्रात आवड असणाऱ्या नवं युवकांना ( वयोगट 18 ते 30 ) उत्तम प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. Coconut Falling Training

या प्रशिक्षणाचा मूळ उद्देश रोजगार निर्मिती आहे. कोकण परिसरात आज अनेक अशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. साधारणपणे एक कुशल कामगार महिना 25 हजार रुपये सहज उत्पन्न प्राप्त करू शकतो. असा दावा पराग कांबळे यांनी केला आहे. यासाठी बळीराज सेनेचे पदाधिकारी यांचे सहकार्य घेऊन हा प्रशिक्षणचा उपक्रम राबविण्यात येईल असे बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. Coconut Falling Training