• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 August 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आयबीपीएस (IBPS) यांच्यामार्फत लिपिक पदांच्या १०२७७ जागा

by Manoj Bavdhankar
August 2, 2025
in Bharat
940 9
0
Clerk posts vacancies through IBPS

Clerk posts vacancies through IBPS

1.8k
SHARES
5.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) यांच्या मार्फत सहभागी असलेल्या ‘बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक पंजाब आणि सिंध बँक’ या बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील ग्राहक सेवा सहयोगी पदांच्या एकूण १०२७७ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘CRP CSA XV EXAM-2025‘ एकत्रित सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक  २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Clerk posts vacancies through IBPS

सदरील जागांपैकी महाराष्ट्रात ११७० जागा भरण्यात येणार असून देशातील अंदमान आणि निकोबार मध्ये १३ जागा, आंध्र प्रदेश मध्ये ३६७ जागा, अरुणाचल प्रदेश मध्ये २२ जागा, आसाम मध्ये २०४ जागा, बिहार मध्ये ३०८ जागा, चंदीगड मध्ये ६३ जागा, छत्तीसगड मध्ये २१४ जागा, दादरा नगर हवेली आणि दीव दमण मध्ये ३५ जागा, दिल्ली मध्ये ४१६ जागा, गोवा मध्ये ८७ जागा, गुजरात मध्ये ७५३ जागा, हरियाणा मध्ये १४४ जागा, हिमाचल प्रदेश मध्ये ११४ जागा, जम्मू & काश्मीर मध्ये ६१ जागा, झारखंड मध्ये १०६ जागा, कर्नाटक मध्ये ११७० जागा, केरळ मध्ये ३३० जागा, लढाक मध्ये ५ जागा, लक्षद्वीप मध्ये ७ जागा, मध्यप्रदेश मध्ये ६०१ जागा, मणिपूर मध्ये ३१ जागा, मेघालय मध्ये १८ जागा, मिझोराम मध्ये २८ जागा, नागालँड मध्ये २७ जागा, ओडिसा मध्ये २४९ जागा, पॉण्डेचेरी मध्ये १९ जागा, पंजाब मध्ये २७६ जागा, राजस्थान मध्ये ३२८ जागा, सिक्कीम मध्ये २० जागा, तामिळनाडू मध्ये ८९४ जागा, तेलंगणा मध्ये २६१ जागा, त्रिपुरा मध्ये ३२ जागा, उत्तरप्रदेश मध्ये १३१५ जागा, उत्तराखंड मध्ये १०२ जागा आणि पश्चिम बंगाल मध्ये ५४० जागा भरण्यात येणार आहेत. Clerk posts vacancies through IBPS

उमेदवाराने भारत सरकारकडून मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता धारण केली असावी. उमेदवारांचे वय किमान २० वर्ष ते कमाल २८ वर्ष दरम्यान असावे, तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता ५ वर्ष, इतर मागास (नॉन क्रिलियर) प्रवर्गाकरिता ३ वर्ष, दिव्यांग प्रवर्गाकरिता १० वर्ष आणि संरक्षण दलात प्रत्यक्ष सेवेचा कालावधी ३ पेक्षा जास्त वर्षे (अनुसूचित जाती/ जमाती गटातील अपंग माजी सैनिकांसाठी ८ वर्षे) कमाल वयोमर्यादा ५० वर्ष आणि विधवा, घटस्फोटित महिला आणि महिला कायदेशीररित्या त्यांच्या पतींपासून विभक्त झालेल्या ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही अशा खुल्या/आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक प्रवर्गा साठी ३५ वर्षांपर्यंत सवलत तर इतर मागास प्रवर्गासाठी ३८ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४० वर्ष सवलत देण्यात आली आहे.  Clerk posts vacancies through IBPS

Tags: Clerk posts vacancies through IBPSGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share738SendTweet462
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.