• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रा. उमराठ तर्फे राबविला स्वच्छतेचा उपक्रम

by Mayuresh Patnakar
November 13, 2023
in Guhagar
70 0
0
Cleanliness initiative carried out by Umrath
137
SHARES
391
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लहानांपासून मोठ्यांपर्यंत लाऊया स्वच्छतेची सवय; जनार्दन आंबेकर

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील नेहमीच वेगवेगळे उपक्रम, शासकीय योजना राबविण्यात, अनिष्ट कालबाह्य रूढी-परंपरा यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी धाडसी निर्णय घेण्यात, जेष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणे यामध्ये सदैव अग्रेसर असणारी ग्रामपंचायत उमराठ तर्फे लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्वच्छतेची सवय लावण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून एक स्वच्छतेचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे साथ दिली.  Cleanliness initiative carried out by Umrath

Cleanliness initiative carried out by Umrath

सदर उपक्रमाअंतर्गत गौरी-गणपती सणाच्या सुरुवातीलाच शाळेच्या सुट्टी मध्ये ग्रामपंचायत उमराठ तर्फे उमराठ गोरिवलेवाडी शाळा नं.१ आणि उमराठ कोंडवीवाडी शाळा नं.३ मधील इयत्ता पहिली ते सातवीतील शालेय विद्यार्थ्यांना बिसलेरी पाण्याच्या एक लीटर बाटल्यांचे वाटप करून सर्व विद्यार्थ्यांना योजना नेमकी काय आहे ते सुद्धा सरपंच जनार्दन आंबेकर यांनी समजावून सांगतले होते. त्याप्रमाणे मुलांनी चॉकलेट, कॅडबरी, बिस्किटचे पुडे, कुरकुरे इत्यादी खाऊ खाल्ल्यावर त्यांची आवरणे (कागद) तसेच घरी वापरले जाणारे शांपू, साबण, तेलपिशवी, दुधपिशवी इत्यादी, अशा छोट्या प्लास्टिकजन्य वस्तूंचे बारीक तुकडे करून बाटलीत पुर्ण गच्च भरल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये आणून द्यायचे होते. या स्वच्छता अभियानात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ आणि सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात येणार आहे असे जाहीर केले होते. Cleanliness initiative carried out by Umrath

Cleanliness initiative carried out by Umrath

त्या प्रमाणे नुकतेच दिवाळी सुट्टी पुर्वी सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या प्लास्टिकजन्य आवरणाने गच्च भरलेल्या बाटल्या उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्याकडे सुपूर्द करून पुन्हा आम्ही दिवाळी सुट्टीत सुद्धा अशाच प्रकारे स्वच्छतेचा उपक्रम  पुन्हा राबवू असे शालेय विद्यार्थ्यांनी सरपंचाना स्वतःहून उत्स्फुर्तपणे सांगितले. या उपक्रमातून खारीच्या वाट्याने का होईना परंतू उमराठ गावातील स्वच्छतेला मोठा हातभार लागला आहे. Cleanliness initiative carried out by Umrath

सदर स्वच्छता अभियान उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व बालवयातच समजले पाहिजे या उद्देशाने ग्रामपंचायत उमराठने राबविलेल्या उपक्रमाचे संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.  या उपक्रमात सहभागी सर्व शालेय विद्यार्थ्यांचे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सर्व शिक्षक व पालकवर्ग यांचे उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मनःपुर्वक अभिनंदन करून आभारही मानले आहेत. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी उमराठचे अनिल अवेरे सर, शैलेश सैतवडेकर सर तसेच ग्रामपंचायत उमराठचे  कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि शाईस दवंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. Cleanliness initiative carried out by Umrath

Cleanliness initiative carried out by Umrath

Tags: Cleanliness initiative carried out by UmrathGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet34
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.