• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य गौरवास्पद

by Guhagar News
March 3, 2026
in Guhagar
60 0
0
Cleanliness campaign in Guhagar city
117
SHARES
335
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सचिन सावंत; सुमारे सहा टन ओला व सुका कचरा संकलन

गुहागर, ता. 03 : गुहागर शहरात डॉ श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानव्दारे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सुमारे सहा टन ओला व सुका कचरा संकलन केला. या प्रतिष्ठानचे सर्व क्षेत्रात गौरवास्पद काम असते असे प्रतिपादन गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले. ते या स्वच्छता अभियानाच्या सांगता समारंभात बोलत होते. Cleanliness campaign in Guhagar city

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबिर, झाडे लागवड, झाडांचे संगोपन करणे यासारखे अनेक उपक्रम होत असतात. याबाबत श्री सदस्य शिस्तबद्ध व नियोजनबद्ध करत असतात. Cleanliness campaign in Guhagar city

Cleanliness campaign in Guhagar city

भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ.श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा चे अध्यक्ष पद्मश्री पूरस्कार सन्मानित डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  गुहागर शहरामध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत गुहागर न्यायालय ते बाजारपेठ, श्री व्याघ्रांबरी देवस्थान वरचापाट ते महावितरण कार्यालय व सर्व शासकीय कार्यालयात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात  गुहागर तालुक्यातील पाच श्री सदस्य बैठकीतील एकुण २२० श्री सदस्यांनी अभियानात १.२५० टन ओला कचरा व ४:४०५ टन सुका कचरा गोळा करून नगरपंचायत डंपिंग ग्राऊंड येथे गोळा करून टाकण्यात आला. Cleanliness campaign in Guhagar city

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री स्वप्निल चव्हाण, उपनगराध्यक्ष श्री.प्रदिप बेंडल, आरोग्य सभापती श्री. सजित साटले, बांधकाम सभापती श्री. उमेश भोसले, नगरसेवक श्री. समिर बागकर, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विदयामंदिर चे मुख्याध्यापक श्री.सुधाकर कांबळे, गुहागर पत्रकार मनोज बावधनकर, श्री. गणेश धनावडे तसेच पोलिस कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. Cleanliness campaign in Guhagar city

Tags: Cleanliness campaign in Guhagar cityGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share47SendTweet29
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.