डॉ. धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभियान
गुहागर : ऑक्टोबरच्या चौथ्या रविवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शेकडो श्री सदस्यांनी शहरात स्वच्छता मोहीम Cleanliness campaign राबवली. डॉ. धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रामध्ये रस्ते दत्तक स्वरूपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे Cleanliness campaign राबवण्यात येत आहे. तसेच शहरातील गुहागर नाका ते गुहागर महाविद्यालयापर्यंत १ किलोमिटरचा रस्ता रविवारी चकाचक करण्यात आला. त्याचबरोबर बस स्थानक आवारही स्वच्छ केले. गोळा केलेला कचरा नगरपंचायतीच्या कचरा गाडीमध्ये तसेच सदस्यांनी काही खाजगी वाहनेही उपलब्ध करून त्याद्वारे कचरा नगरपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेमध्ये टाकण्यात आला. या मोहिमेत सुमारे ३ टन ओला, तर १ टन सुका कचरा गोळा करून नगरपंचायतीच्या कचरा प्रकल्पात टाकण्यात आला. प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी गुहागर शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात Cleanliness campaign राबविण्यात येणार आहे. पुढील महिन्यात गुहागर महाविद्यालय ते शासकीय विश्रामगृहपर्यंत मार्ग स्वच्छतेसाठी घेण्यात येणार आहे.
