• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नगरपंचायतीतर्फे एक तास एक साथ स्वच्छता उपक्रम

by Manoj Bavdhankar
October 3, 2023
in Guhagar
92 1
0
Cleanliness activities by the municipal council
180
SHARES
514
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत  रविवार दि. 01 रोजी एक तास श्रमदान करून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्याचे नियोजन गुहागर नगरपंचायतीमार्फत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. व त्यानंतर नियोजित ठिकाणी पाऊसाचा जोर असूनही सर्व ठिकाणांची एक तास एक साथ श्रमदान करून सर्व परिसर स्वच्छ केला. Cleanliness activities by the municipal council

Cleanliness activities by the municipal council

यामध्ये गुहागर तालुक्यातील गुहागर समुद्र किनारा, गुहागर खालचापाट समुद्र किनारा, गुरववाडी अतंर्गत रस्ते, गुहागर दुर्गादेवीवाडी रस्ता, गुहागर वरचापाट समुद्र किनारा, बाग समुद्र किनारा, गुहागर नाका ते शिवाजीचौक रस्ता व गुहागर जीवनशिक्षण शाळा क्र. 1 ते सेवा मंदिर किर्तनवाडी या ठिकाणांची स्वच्छता केली. Cleanliness activities by the municipal council

या उपक्रमाकरिता श्रीम. प्रतिभा वराळे, तहसिलदार गुहागर,पोलिस निरिक्षक प्रतिनिधी कांबळे साहेब, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. संतोष वरंडे व त्यांचे सर्व सहकारी, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विदयामंदिर गुहागरचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे  व त्यांचे सर्व सहकारी व विद्यार्थी, डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, सर्व पत्रकार बंधू, गुहागर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्षा व नगरसेविका सौ. स्नेहा भागडे, सौ. निधी सुर्वे, माजी उपनगराध्यक्षा सौ. प्रणिता साटले, माजी शिक्षण सभापती श्री. उमेश भोसले, माजी नगरसेवक श्री. गजानन वेल्हाळ, माजी बांधकाम सभापती श्री. माधव साटले, माजी नगरसेविका सौ. मृणाल गोयथळे, माजी नगरसेविका सुजाता बागकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. सिध्दी आरेकर, श्री व्याघ्रांबरी मित्र मंडळाचे सर्व सदस्य, किर्तनवाडी प्रिमियर लीगचे सर्व सदस्य, नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व बँक अधिकारी व कर्मचारी, सर्व व्यापारी, हॉटेल चालक मालक संघटनेचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक व नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. Cleanliness activities by the municipal council

Tags: Cleanliness activities by the municipal councilGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.