बारमाही पाण्यामुळे साचला होता गाळ
गुहागर, ता.17 : गुहागर चिपळूण या मार्गावरील रामपूर या गावात असणाऱ्या पुरातन तलावाची साफसफाई नुकतीच करण्यात आली. या गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण व बंटी चव्हाण यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि हा तलाव साफ करण्यात आला. cleaned historical tank

रामपुर गावात असणारा हा जुना तलाव हा ब्रिटीशकालीन असून तो अनेक वर्ष साफ करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत होते. या तलावात पाणी वर्षाचे बारा महिने असतं त्यामुळे तो साफ करण्यास अनेक अडचणी येत होत्या. मात्र नुकतेच मनीषा कंट्रक्शन यांच्या सहकार्याने माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेत या तलावातील गाळ काढून तलाव साफ केला. त्यामुळे या परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. cleaned historical tank
