रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे घेण्यात आली. या बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ रत्नागिरी येथील टॅक्स कन्सल्टंट श्री. राजेश सोहोनी यांचे हस्ते करण्यात आला. Classical chess tournament in Ratnagiri

श्री. सोहोनी व रत्नागिरी मधील जुनेजाणते बुद्धिबळपटू श्री. सुभाष शिरधनकर यांनी पटावर प्रतिकात्मक चाली रचून स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी, आयोजक चैतन्य भिडे व रत्नागिरीतील बुद्धिबळप्रेमी मान्यवर उपस्थित होते.फिडे मानांकन नसलेल्या खेळाडूंना क्लासिकल डाव लिहून खेळण्याची संधी मिळावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. Classical chess tournament in Ratnagiri

या स्पर्धेसाठी मंडणगड, गुहागर, देवरुख, खेड इत्यादी तालुक्यांतील खेळाडूंसह रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण चौतीस बुद्धिबळपटू स्पर्धेत सहभागी झाले होते. एकूण सहा फेऱ्यांमध्ये स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय नियमां नुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. बहुतांश ठिकाणी बुद्धिबळाच्या जलद व अतिजलद स्पर्धाच अधिक प्रमाणात चालू होते. खेळाडूंना क्लासिकल प्रकारात विचार करायला अधिक वेळ मिळावा या हेतूने अश्या विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. Classical chess tournament in Ratnagiri
