संगणक सुविधा देणारे तालुक्यातील पहिले प्ले स्कुल
गुहागर, ता. 13 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कुल तर्फे बालगोपाळांना संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पना राबविणारे या संस्थेचे संस्थापक संचालक साहिल आरेकर यांनी यापूर्वी आपल्या प्ले स्कुलसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमही निश्चित केला आहे. Children at Kanhaiya Play School will use computers


माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील लहान मुले सध्या मोठ्या मंडळींपेक्षा सहजपणे स्मार्ट फोन वापरतात. हे लक्षात घेवून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग साहिल आरेकर यांनी आपल्या कन्हैया प्ले स्कुलमध्ये केला आहे. आज लहान मुलांना इंग्रजी अक्षरांची, संख्यांची माहिती व्हावी म्हणून विशेष संगणक बाजारात उपलब्ध आहेत. लॅपटॉप सारख्या दिसणाऱ्या या संगणकांमध्ये इंग्रजी अक्षरे व संख्यांची ओळख करुन देणारे खेळ आहेत. त्याचबरोबर संगीताचा आनंदही विद्यार्थ्यांना मिळतो. किबोर्ड देखील मुलांना हाताळता येईल असा आहे. त्यामुळे खेळता खेळता इंग्रजी अक्षरे, संख्या त्यांचा उच्चार कसा करायचा यासर्वाची माहिती मुलांना होते. ही सुविधा प्ले स्कुलमध्ये उपलब्ध करुन देण्यारे कन्हैया प्ले स्कुल हे तालुक्यातील पहिले प्ले स्कुल ठरले आहे. Children at Kanhaiya Play School will use computers


आज कन्हैया प्ले स्कूल येथे kids laptop (संगणक) या सुविधेचे उद्घाटन माजी नगरसेविका सौ. सुजाता ताई बागकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी सौ. राऊत मॅडम, संस्थेच्या महीला मंडळ सदस्य सौ. रुपालीताई खातु, सौ. संज्योती विखारे आणि विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते. Children at Kanhaiya Play School will use computers