• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे तपासणी शिबीर

by Mayuresh Patnakar
September 26, 2023
in Ratnagiri
110 1
2
Checkup Camp by Test Tube Baby Centre
216
SHARES
618
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरीत दि. १ ऑक्टोबर रोजी स. 10 ते 12 या वेळेत

रत्नागिरी, ता. 26 : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर रविवारी दि. १ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. हे शिबीर सकाळी 10 ते 12 या वेळेत धन्वन्तरी रुग्णालयात होणार असून निपुत्रीक जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धन्वंतरी रूग्णलयातर्फे करण्यात आले आहे. Checkup Camp by Test Tube Baby Centre

रत्नागिरी शहरातील शिवाजी नगर येथील धन्वंन्तरी रुग्णालयातील सन 2014 मध्ये सुरु झालेल्या कोकणातील पहिल्या अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये डॉ. तोरल शिंदे या दर महिन्याला मोफत तपासणी शिबीर घेत असतात. या शिबिरांमध्ये माता आणि पिता होण्यासाठी इच्छुक जोडप्याना टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते. Checkup Camp by Test Tube Baby Centre

त्याशिवाय पीसीओडी संदर्भातील समस्या, गर्भनलिका तपासणे, स्त्रीबीज तयार न होणे व न फुटणे, गर्भाशयाच्या गाठी व गर्भाशय काढणे, वारंवार आययूआय, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, गर्भ रुजू न होणे, वारंवार होणारे गर्भपात, पाळीच्या तक्रारी, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, पुरुषांमध्ये असलेली शुक्राणूंची संख्या व हालचाली कमी असणे, तसेच सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांवर डॉ. तोरल शिंदे या शिबिरामध्ये मोफत मार्गदर्शन करतात. Checkup Camp by Test Tube Baby Centre

हे शिबीर या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत धन्वन्तरी रुग्णालयात होणार असून या शिबिराचा निपुत्रीक जोडप्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन धन्वंतरी रूग्णलयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरीत 02352-221282, 02352- 355059, 9527044901 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Checkup Camp by Test Tube Baby Centre

Tags: Checkup Camp by Test Tube Baby CentreGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.