प्रवाशी वर्गातून मागणी
गुहागर, ता.14 : गुहागर शहर शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्याने शहर नाक्यातील अरूंद रत्यावरून वरचापाट, बाग, रानवी मार्गे होणारी ट्रॅव्हल्सची वाहतुक गेला आठवडाभर बंद झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुक कोंडीही कमी झाली आहे. मात्र टीपी व प्रवासी वीम्याबाबत अजूनही स्पष्ट खुलासा ट्रॅव्हल्सधारकांकडून झाला नाही. याची उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांन चौकशी करण्याची मागणी होत आहे. Check TP and passenger insurance
गुहागर तालुक्यात मोठया प्रमाणात ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतुक करत आहेत. यातील पाच ते सहा ट्रॅव्हल्स दररोज सायंकाळी व सकाळी गुहागर शहर नाक्यातून वरचापाट, बाग, रानवीमार्गे प्रवास करत होत्या. परिणामी दररोज शहरात वाहतुक कोंडी होत होती. हॉर्नचा कर्णककर्श आवाज करत धावणाऱ्या ट्रॅव्हल्स आता अरूंद मार्गावरील कमी झाल्याने वाहतुक कोंडीचाही प्रश्न काही अंशी मिटला आहे. गुहागर शहर शिवसेनेच्यावतीने गेल्या आठवडयामध्ये या सर्व ट्रॅव्हल्सधारकांना योग्य समज देण्यात आली होती. Check TP and passenger insurance
त्यानंतर गुहागर पोलिस निरिक्षक यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थितांपैकी एका ट्रॅव्हल्सधारकानेच आपल्या वाहनाचे कागदपत्र दाखवीले. परंतु उर्वरीत ट्रॅव्हल्सधारकांचे काय हा प्रश्न अनिर्णितच राहीला आहे. ट्रॅव्हल्सच्या मालकांनी शहर शिवसेनेबरोबर बैठक घेऊन बंद करण्यात आलेल्या मार्गावर ठरावीक थांब्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल ठरला असून शहर शिवसेनेने आपली भूमिका ठाम ठेवली आहे. मात्र ट्रॅव्हल्सची वाहतुक बंद झाल्याने शहरातील वाहतुक कोंडी कमी झाली आहे. Check TP and passenger insurance
ट्रॅव्हल्सची टीपी व प्रवासी वीम्याची व्हावी तपासणी
मुंबईकडे अनेक ट्रॅव्हल्स धावताना दिसून येतात. ज्यांचे बुकींग असेल ते प्रवासी घेऊन त्यांचा वीमा काढून ट्रॅव्हल्सधारकांनी प्रवासी वाहतुक करावयाची आहे. या प्रवासाचा ट्रान्सपोर्ट परमिटही काढावयाचा आहे. परंतु हा विषय अनिर्णीतच राहीला आहे. एखादी दुर्घटना घडल्यास प्रवासीवर्गाचा बीमा कवच नसल्याने अपघाताचा कोणताच प्रासंगीक लाभ मिळू शकत नाही. यामुळे सुरक्षित प्रवासासाठी ट्रॅव्हल्सधारकांनी प्रवाशांचा नियमित वीमा काढणे आवश्यक आहे. यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गुहागर तालुक्यातील सर्व ट्रॅव्हल्सच्या कागदपत्राची तपासणी करावी अशी मागणीला होत आहे. Check TP and passenger insurance