गुहागर, ता. 16 : चतुरंगच्या निवासी अभ्यास वर्गासाठी गुहागर शहरातील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील शास्त्र, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयातील आर्या मंदार गोयथळे, नीरजा विकास निमकर, रेईशा वीरेंद्र चौगुले, विवेक राजेंद्र बाणे यांची निवड करण्यात आली आहे. Chaturanga Residential Study Class
चतुरंग प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी एक जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण या ठिकाणी संपन्न झाली. यामधून जिल्ह्यातील 60 विद्यार्थ्यांची निवड चिपळूण तालुक्यातील वहाळ या ठिकाणी होणाऱ्या दिवाळी निवासी वर्गासाठी करण्यात आली आहे. Chaturanga Residential Study Class

यामध्ये गुहागर तालुक्यातील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयांमधून या परीक्षेसाठी सहा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी चार विद्यार्थ्यांची निवड निवासी अभ्यास वर्गासाठी झाली आहे. यामध्ये आर्या मंदार गोयथळे, नीरजा विकास निमकर, रेईशा विरेंद्र चौगुले व विवेक राजेंद्र बाणे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल गुहागर एज्युकेशन सोसायटी शालेय प्रशासन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत निवड पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. Chaturanga Residential Study Class