कु.सृष्टी नेटके, कु. पूजा माहिते व कु.गार्गी काळे यांची निवड
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 14 : चतुरंगच्या निवासी अभ्यास वर्गासाठी गुहागर तालुक्यातील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयातील कु. सृष्टी वैभव नेटके, कु. पूजा राजेश मोहिते, कु. गार्गी उल्हास काळे यांची निवड करण्यात आली आहे. Chaturanga Residential Study Class
चतुरंग प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी एक जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षी ही परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण या ठिकाणी संपन्न झाली. जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. यामधून जिल्ह्यातील 60 विद्यार्थ्यांची निवड चिपळूण तालुक्यातील वहाळ या ठिकाणी होणाऱ्या दिवाळी निवास वर्गासाठी करण्यात आली आहे. Chaturanga Residential Study Class

यामध्ये गुहागर तालुक्यातील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयामधून या परीक्षेसाठी 6 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची निवड या निवासी अभ्यास वर्गासाठी झाली आहे. यामध्ये कुमारी सृष्टी वैभव नेटके, कुमारी पुजा राजेश मोहिते, कुमारी गार्गी उल्हास काळे या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल मुख्याध्यापक डी. डी. गिरी, लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, चंद्रकला फाउंडेशनच्या सचिव सौ. स्नेहल बाईत यांचेसह सर्व संस्था पदाधिकाऱ्यांमार्फत निवडपात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. Chaturanga Residential Study Class