दत्तगुरू, स्वामी समर्थ, साईबाबा, गजाजन महाराज यांचा देखावा
गुहागर, ता. 25 : संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक येथील युवा गणेश मित्रमंडळ निव्याचा राजा या मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त चांद्रयान- ३ ची प्रतिकृती त्याच्यासमवेत दत्तगुरू, स्वामी समर्थ, साईबाबा, गजाजन महाराज यांचा देखावा साकारला आहे. हा देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तर उध्दव ठाकरे गटाचे नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव व राष्ट्रवादीचे चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी निव्याच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी उध्दव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. Chandrayaan- 3 scenes on the occasion of Ganeshotsav
युवा गणेश मित्रमंडळ निव्याचा राजा या मंडळाचे यंदाचे १८ वे वर्ष असून या मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी या मंडळाने रक्तदान शिबीर, आरोग्यशिबीर, महिलांची होममिनिस्टर स्पर्धा, मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या मंडळाला यावर्षीच्या जिल्हास्तरीय मंगलमुर्ती सजावट स्पर्धेत चौथा क्रमांक मिळाला आहे. तर संगमेश्वर तालुकास्तरीय मंगलमुर्ती सजावट स्पर्धेत या मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. हे मंडळ संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या मंडळाने आपले वेगळेपण जपले आहे. Chandrayaan- 3 scenes on the occasion of Ganeshotsav
यावर्षी या मंडळाने गणेशोत्सवानिमित्त चांद्रयान- ३ प्रतिकृती त्याच्यासमवेत दत्तगुरू, स्वामी समर्थ, साईबाबा, गजाजन महाराज यांचा सुंदर देखावा साकारला आहे. हा देखावा लक्षवेधी ठरत आहे. यापुर्वी या मंडळाला रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक व देवरूख पोलीस ठाण्यातर्फे शिस्तबद्ध गणेश मंडळ व राज्यशासनाचा संगमेश्वर पंचायत समितीमार्फत दिला जाणारा लोकमान्य पुरस्कार (प्रथम क्रमांक) मिळाला आहे. निव्याचा राजा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य देखावा साकारण्यासाठी व गणेशोत्सव काळात प्रचंड मेहनत घेत असतात. यावर्षी आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी निव्याच्या राजाचे दर्शन घेतले. Chandrayaan- 3 scenes on the occasion of Ganeshotsav
यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष व युवानेते रोहन बने, संपर्कप्रमुख सुरेश कदम, संगमेश्वर तालुकाध्यक्ष बंड्या बोरूकर, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद झगडे, वेदा फडके, मुन्ना थरवळ, संतोष चाळके, संतोष जाधव, सचिन इप्ते आदींसह कार्यकर्ते व निव्याचा राजा मंडळाचे अध्यक्ष वैभव गावणकर व सदस्य उपस्थित होते. Chandrayaan- 3 scenes on the occasion of Ganeshotsav