पूजा आंब्रे, समृद्धी भोजने जिल्ह्यात प्रथम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 14 : रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोलीच्या कु. पूजा अरुण आंब्रे हिने 14 वर्षाखालील वयोगटात व कु. समृद्धी सुधाकर भोजने हिने 17 वर्षाखालील वयोगटात कराटे स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. Chandrakant Bait Vidyalaya’s success in karate competition

कु. पूजा अरुण आंब्रे व कु. समृद्धी सुधाकर भोजने यांची जिल्हास्तरावर स्पर्धा होऊन आता विभाग स्तरावर स्पर्धा होईल व राज्यस्तरावर स्पर्धेसाठी त्या पात्र होतील. या दोन्ही विद्यार्थिनींचे प्राध्यापक डी.डी. गिरी, लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, चंद्रकला फाउंडेशनच्या सचिव सौ. स्नेहल बाईत यांचेसह गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक संघटना यांच्यावतीने या विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. Chandrakant Bait Vidyalaya’s success in karate competition